मर्जर-मर्जर खेळाचे सुवर्णपदक हे संजय राऊत यांच्या पक्षालाच मिळणार आहे, कारण येत्या काही दिवसांत या खेळात त्यांचाही पक्ष सहभागी होणार आहे. ठाकरे गटाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याच्या प्रयत्नात संजय राऊत असून, काँग्रेसच्याच अजेंड्यावर यांचा पक्ष चाल
.
नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केल्यानंतर संजय राऊत काँग्रेसकडून खासदार होणार आहेत. मर्जरच्या खेळात कोणाचीही फिक्सिंग नसते, तिथे दोघांच्या निर्णयावर सर्व काही ठरते आणि तिथे पंचाची गरज नसते. विलीनीकरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. त्यांनी आणि शरद पवारांनी एकत्रित बसून हा निर्णय घ्यायचा आहे. संजय राऊत काय शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? शरद पवार जो निर्णय घेतात, त्याबद्दल कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही. राऊतांनी यावर काही बोलू नये, अन्यथा ते तोंडावर पडतील.
रोहित पवारांवरही टीकास्त्र
नवनाथ बन म्हणाले की, रोहित पवार हे राज्यातील सर्वात अहंकारी आमदार आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले नाही, म्हणून त्यांची मोठी अडचण झाली आहे. ते येत्या काही दिवसांत काँग्रेसचा नेता होण्याचा प्रयत्न करतील. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे; पण त्यांना कोणीही सोबत घेणार नाही.
शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांचा पाढा
नवनाथ बन म्हणाले की, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, हे कायम शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने कोणतीही निवडणूक नसताना कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, तसेच दिवाळीसाठी 5 हजार रुपयांची थेट मदत केली, ज्याचा लाभ दीड कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने 62 हजार कोटी रुपयांचे खत अनुदान मंजूर केले आहे. खताचे दर वाढू नयेत यासाठी 24 हजार कोटी रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ‘देवाभाऊ’ स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख समजून घेण्याचे काम करत असतात.
नवी मुंबईत काही पाकिस्तानी राहत नाहीत
नवनाथ बन म्हणाले की, मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करत नाही; पण राऊतांना प्रत्येक विकासकामाला विरोध करायचा असतो, तसाच विरोध त्यांनी नवी मुंबई विमानतळालाही केला आहे. नवी मुंबई हे काही दुसऱ्या देशात नाही, तिथे जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असेल, तर त्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी होत नाही. उलट, राऊतांनीच मुंबईचे महत्त्व कमी करत मराठी माणसाला कल्याण, डोंबिवली आणि खारघरपर्यंत स्थलांतरित केले, त्याला मुंबईचे महत्त्व कमी करणे म्हणतात. राऊतांना नवी मुंबई विमानतळाचा त्रास होत आहे, पण तिथे काही पाकिस्तानी राहत नाहीत, तिथेही मराठी माणूसच राहतो. ठाकरे गट प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा अजेंडा राबवत आहे, मात्र मुंबई कधीच महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. हे ही वृत्त वाचा
संजय शिरसाट अन् रायगडचे नेते महायुतीत मीठाचा खडा टाकत आहेत:एकनाथ शिंदेंनी त्यांना समज द्यावी, राष्ट्रवादीचा तिसरा गट होण्याचा संबंधच नाही- हसन मुश्रीफ

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि रायगडमधील काही नेते महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आमदार एकसंघ असून, तिसरा गट स्थापन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर