![]()
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ शस्त्रांचा भव्य ठेवा आता मुंबईकरांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालया’च्या वतीने आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या आंतरराष्ट्रीय शस्त्रप्रदर्शनाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे आज मुंबईत उद्घाटन होत आहे. सायंकाळी ४.३० वाजता मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ येथे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन पार पडणार आहे. तीन शहरांतील यशानंतर आता राजधानी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाने लंडनमधील ‘व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट’ संग्रहालयाशी करार करून शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे भारतात आणली आहेत. या वाघनखांसह १६ व्या ते १८ व्या शतकातील ‘मराठा व समकालीन शस्त्रे’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. सातारा (पहिले पर्व), नागपूर (दुसरे पर्व) आणि कोल्हापूर (तिसरे पर्व) येथील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या प्रदर्शनाचा अंतिम टप्पा राजधानी मुंबईत पार पडत आहे. ‘अटक ते कटक’ संकल्पनेवर विशेष भर मुंबईतील या प्रदर्शनासाठी ‘अटक ते कटक’ ही विशेष संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात झाला. अटकेपार मराठा साम्राज्याची पताका फडकवणारे रघुनाथराव पेशवे आणि कटकपर्यंत राज्याचा विस्तार करणारे सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांच्या शौर्याची साक्ष देणारी शस्त्रे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे इतिहासप्रेमींना आवाहन कोल्हापूरनंतर आता मुंबईत हे प्रदर्शन होत असल्याने इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मराठा साम्राज्याचा शौर्यशाली इतिहास अगदी जवळून अनुभवण्याची मोठी संधी मिळाली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्वराज्याचा वीरवारसा आणि ऐतिहासिक शस्त्रपरंपरेची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन प्रदर्शनाचे संकल्पनाकार तथा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी केले आहे. ——- हेही वाचा.. पोलिस आयुक्तांचे वसुलीचे टार्गेट, शहरात चिरीमिरीचे काम सुरू:घरावरील हल्ल्यानंतर संजय शिरसाट संतापले, मुख्यमंत्र्यांकडे चांगला CP देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांवर आणि पोलिस प्रशासनावर भ्रष्टाचाराचे, वसुलीचे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केला आहे. सविस्तर वाचा
Source link
शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं आता मुंबईत:'शिवशस्त्रशौर्यगाथा' प्रदर्शनाच्या चौथ्या टप्प्याचे आशिष शेलारांचे हस्ते आज उद्घाटन