Headlines

'अजितदादांबद्दल सहानुभूती, पण त्यांच्याच पक्षातील नेते काड्या करतात':राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर मनोज जरांगेंचे विधान




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील विविध नेत्यांकडून यावर भाष्य केले जात आहे. मात्र, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली असली तरी, यावरून सस्पेन्स अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. याच विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी विधान केले असून ते म्हणाले की, अजितदादांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील दोन-तीन नेते काड्या करतात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य करताना तसेच राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले की, माणुसकी आणि नीतीमत्ता सोडलेले सरकार आजपर्यंत पाहिले नाही. सत्तेसाठी ईडी आणि चौकशीचा वापर करणारे हे पहिलेच सरकार आहे, अशी टीका जरांगे यांनी केली आहे. समाजाने वेड्यात काढू नये म्हणून सरकारला वेळ देत असल्याचेही त्यांनी म्हटले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, अजितदादांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील दोन-तीन जण काड्या करतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाशी आम्हाला देणे घेणे नाही. मराठा आरक्षण आणि प्रमाणपत्राच्या लढ्याशी आम्ही प्रामाणिक आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यात सरकारकडून अडथळे आणले जात आहेत. सातारा आणि औंध गॅझेट लागू न करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. तर 500 कोटींच्या कथित व्यवहारावरून शिंदेंच्या शिवसेनेलाही जरांगे यांनी सवाल केला आहे. दरम्यान धाराशिवच्या येडशी गावातील करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, कुटुंबातील एकमेव उरलेल्या कृष्णाला आई-वडील, भाऊ-बहिणीचे छत्र पुन्हा मिळणार नाही. तसेच या घटनेच्याबाबतीत अग्निशमन विभागाच्या हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच यात जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम:विलीनीकरणाची तारीखही ठरली होती, दादांसोबत चर्चा झाली होती- सुप्रिया सुळेंचा खुलासा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, अगदी तारीखही ठरली होती. पण ज्या दिवशी दादा गेला, त्या दिवशी माझ्या मनात आणि पक्षामध्ये या विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’ मिळाला आहे,” असे स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *