![]()
हिंगोलीत सकल बॅडमिंटन प्रेमींच्या वतीने प्रथम अखील भारतीयस्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण शुक्रवारी ता. 13 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांनी यावेळी दिले. हिंगोली शहरात यावर्षी प्रथमच अखील भारतीयस्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ता. 27 व ता. 28 फेब्रूवारी 2027 अशा दोन दिवसीय या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत नांव नोंदणीसाठी ऑनलाईन गुगल फॉर्म तयार केले जाणार आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून सुमारे 150 पेक्षा अधिक संघ या स्पर्धेत सहभागी होण्याचा अंदाज असून त्यानुसार महाराष्ट्रासह राज्याबाहेरील संघासोबत वैयक्तिकरित्या संपर्क साधला जात आहेत. हिंगोलीच्या जिल्हा क्रीडा संकुलातील चार कोर्टवर या स्पर्धा होणार आहेत. खुला गट, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षावरील गटांसोबतच जेष्ठ खेळाडूंसाठी स्पर्धा होणार आहेत. यास्पर्धेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारीही आयोजकांनी सुरु केली आहे. दरम्यान, आज हिंगोलीच्या माजी खासदार शिवाजीराव देशमुख सभागृहात स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार संतोष बांगर, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवाजीराव मुटकुळे, चौधरी, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजीत खुराणा, अभियंता अशोक अग्रवाल, सुरेश सराफ, मनोज आखरे, सुनील देवडा, जितसिंग साहु, गणेश बांगर, डॉ. शिवाजी गिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. हिंगोलीत प्रथमच अखील भारतीयस्तरावर या स्पर्धा होत असून हिंगोलीच्या क्रीडाक्षेत्रासाठी हि अभिमानाची बाबत आहे. यास्पर्धेसाठी सर्वतोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांनी दिले. हिंगोलीच्या खेळाडूंचा सत्कार यावेळी कार्यक्रमात राज्यभरात स्पर्धा गाजवलेल्या हिंगोलीचे बॅडमिंटनपटू पंकज राठोड,अतुल बोरकर, डॉ अजय शिरडकर,संतोष कदम, सुरेश संचेती, अनिल शिंदे कार्तिक यादव, रुपेश सोनी, सुनील राठोड, जयदीप साहू यांचा सत्कार करण्यात आला
Source link
हिंगोलीत रंगणार अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा:लोगोचे अनावरण, 150 हून अधिक संघ सहभागी होणार