Headlines

40 गावांचा प्रवास जीवघेणा:निधी मंजूर, दोनदा भूमिपूजनही; तरीही लाडसावंगी-करमाड रस्ता खड्ड्यातच, अत्यंत महत्त्वाच्या राज्य मार्गाची सध्या अक्षरशः चाळणी



लाडसावंगी ते करमाड या अत्यंत महत्त्वाच्या राज्य मार्गाची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी दोन वर्षांपूर्वीच निधी मंजूर झाला असून, मोठ्या थाटामाटात दोन वेळा भूमिपूजनही पार पडले. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला मुहूर्

.

दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर झाल्यानंतर खड्ड्यांच्या त्रासातून कायमची सुटका होईल, अशी आशा नागरिकांना वाटली होती. दोनदा भूमिपूजनाचे सोपस्कारही पार पडले; मात्र भूमिपूजनाच्या पाट्या आणि नेत्यांच्या आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात एकही वीट रचली गेलेली नाही. दुसरीकडे, काँक्रीटीकरणाच्या कामात शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याचा मुद्दा पुढे करत काही शेतकरी मोबदल्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे कामात अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा प्रस्तावित रस्ता जुन्या रस्त्याच्या हद्दीतच होणार असून, त्यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज नसल्याची माहिती समोर येत आहे. असे असताना नेमकी अडवणूक कशासाठी केली जात आहे, यामागील सत्य प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

एकीकडे निधीची मंजुरी आणि भूमिपूजनाचे श्रेय घेतले जाते, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तांत्रिक व स्थानिक अडथळे दूर करावेत आणि मंजूर निधीचा विनियोग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी ४० गावांतील नागरिकांनी केली आहे.

अन्यथा, निधी असूनही या भागातील जनतेच्या नशिबी खड्ड्यांचाच प्रवास कायम राहील, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, प्रवासाचा वेळही वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि रुग्णवाहिकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना मरणयातना भोगाव्या लागत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *