Headlines

ट्रकवर तार पडल्याने 7 वाहने जळाली:अक्कलकोटात 4 तास आग धुमसत होती, अग्निशमनच्या 6 बंबांचा वापर




माल ट्रक व सिमेंट बल्कर ट्रक उभे असलेल्या ठिकाणी विद्युत वाहन करणारी इलेक्ट्रिक तार कोसळून शार्ट सर्किट झाल्याने ७ वाहने जळून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. सोलापूर ते अक्कलकोट मार्गावरील हॉटेल समर्थ, अक्कलकोट येथे ही दुर्घटना घडली. मंगळवारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोकळ्या जागेत घडलेल्या आगीच्या घटनेची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली. ही आग ४ तास धुमसत होती. सहापेक्षा अधिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश नागेश व्हनमाने (वय २९) यांनी खबर दिली. हॉटेल समर्थ शिवनेरी, सोलापूर रोड, अक्कलकोट येथे मोकळ्या जागेत लावलेले मालट्रक व सिमेंट बल्करवर इलेक्ट्रिक तार पडली. शार्ट सर्किट होऊन वाहनांना आग लागली. सिमेंट बल्कर (एमएच १२ वाय क्यू ३९९१) यासह सहा वाहने जळून खाक झाली. एक वाहन ५० टक्के जळाले. सुमारे २.५ ते ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. माल ट्रक व सिमेंट बल्कर ट्रक रात्री उशिरापर्यंत जळत होते. सपोनि अमोल पन्हाळी हे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *