Headlines

शेतातून परतणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या बैलगाडीला भरधाव कारची धडक:नांदुरा-मोताळा मार्गावर दुर्घटना; दोन्ही बैल गंभीर‎, शेतकरी ठार




दिवसभर शेतात कष्ट करून ‎बैलगाडीने घराकडे परतणाऱ्या‎ एका वृद्ध शेतकऱ्यावर काळाने ‎घाला घातला. नांदुरा-मोताळा‎मार्गावर लोनवडी गावाजवळ‎ भरधाव कारने बैलगाडीला ‎जोरदार धडक दिली. यात 70‎ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू‎झाला. ही घटना बुधवार, 11 ‎नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7‎ वाजता घडली. धडकेची तीव्रता ‎इतकी प्रचंड होती की बैलगाडीचे‎ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.‎ त्याला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर‎ जखमी झाले आहेत.‎ मिळालेल्या माहितीनुसार,‎ वासुदेव तुळशीराम कुटे (वय ‎अंदाजे 70, रा. लोनवडी) असे ‎मृत शेतकऱ्याचे नाव आहे.‎ वासुदेव कुटे हे नेहमीप्रमाणे ‎शेतातील कामे पूर्ण करून‎ बैलगाडीने गावाकडे निघाले होते.‎लोनवडी गावाजवळ पोहोचले‎ असताना नांदुऱ्याच्या दिशेने‎ भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कार‎ (क्रमांक एमएच 34 बीआर‎7555) वरील चालकाचे‎ अचानक नियंत्रण सुटले. सदर‎ वाहनाने वासुदेव यांच्या ‎बैलगाडीला जोरदार धडक दिली.‎या अपघातात बैलगाडीचा‎ अक्षरशः चुराडा झाला. गंभीर‎ मार लागल्याने वासुदेव कुटे यांचा‎ घटनास्थळीच मृत्यू झाला.‎ अपघाताची वार्ता समजताच‎ नांदुरा येथील ओमसाई‎ फाउंडेशनची रुग्णवाहिका‎ स्वयंसेवकांसह तातडीने ‎घटनास्थळी पोहोचली. विलास‎ निबोळकर, बळीराम गोड, प्रमोद ‎वरदे, संजय चोपडे, साहेबराव ‎फासे आणि इतर स्वयंसेवकांनी‎ मदतकार्य सुरू केले. त्यांच्या‎सहकार्याने मृतदेह नांदुरा येथील ‎प्राथमिक आरोग्य केंद्रात‎ हलवण्यात आला. दरम्यान,‎अपघातात गंभीर जखमी ‎झालेल्या दोन्ही बैलांची प्रकृती ‎चिंताजनक आहे. पशुप्रेमी आणि‎ ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली ‎जात आहे.‎ शेतातील दिवसभराचे कष्ट‎संपवून घराकडे परतणाऱ्या‎ वासुदेव कुटे यांचा प्रवास अशा‎प्रकारे मृत्यूने संपला. त्यामुळे‎ लोनवडी गावावर दुःखाचा डोंगर ‎कोसळला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा ‎पसरली आहे. ग्रामस्थांमधून ‎हळहळ व्यक्त होत आहे. ‎क्षणभराच्या अपघाताने एका‎कुटुंबाचा आधार हिरावला ‎गेल्याची भावना परिसरातून ‎व्यक्त केली जात आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *