![]()
अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये होते. महायुतीमध्ये त्यांना फार सन्मानाने जगता येत नव्हते आणि ‘हे घातकी लोक असून फसवतात,’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे सहकारीही हेच सांगत होते, त्यामुळे एकत्र येत माघारी वळले पाहिजे, असा त्यांचा विचार होता, असे वक्तव्य शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांचा मोठा भ्रमनिरास झाला होता आणि ते पुन्हा माघारी येणार होते. ते केवळ तपास यंत्रणांच्या भीतीपोटी भाजपसोबत गेले होते. त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांच्यासारखे काही नेतेही होते. हसन मुश्रीफांचे शरीर वाघाचे असले तरी काळीज उंदराचे आहे, त्यामुळे त्यांची कशी पळापळ झाली हे सर्वांना माहीत आहे. इतके सगळे करूनही त्यांच्यावरील तपास बंद करण्यात आला नाही. त्यामुळे ‘येथे थांबून उपयोग नाही आणि स्वाभिमानाने राहता येणार नाही, असा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूवर कुटुंबीयांनी आवाज उठवावा संजय राऊत म्हणाले की, महायुतीमधून बाहेर पडून अजित पवार हे एक उत्तम विरोधी पक्षनेते होऊ शकले असते. ‘माझ्याकडेही भाजप नेत्यांच्या फाईल्स आहेत,’ असे ते बोलले होते, ज्यावरून त्यांची महायुती सोडण्याची स्पष्ट मानसिकता होती. त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आवाज उठवला पाहिजे. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन लढत आहोत; पण अजित पवारांचे कुटुंबीय इतके शांत कसे राहू शकतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विलीनीकरणाची चर्चा आणि भाजपवर टीका संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेसोबत आमचा काहीही संबंध नाही. महाविकास आघाडीचा संबंध केवळ एवढ्याच गोष्टीशी आहे की, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या या नाट्यावर आधीच पडदा टाकला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा हे दोन्ही गट गिळंकृत करतील. हे गट अमित शहांनी गिळले हे खुद्द फडणवीस यांनाही कळणार नाही. या नेत्यांना कोणताही निर्णय घेण्यासाठी वारंवार दिल्लीत जावे लागते, म्हणजेच त्यांचे पक्षावर कोणतेही नियंत्रण नाही. सुप्रिया सुळे यांनी जेव्हा स्पष्ट केले की विलीनीकरणाचा कोणताही विषय नाही आणि आम्ही त्यावर पडदा टाकला आहे, मग हे लोक आता पुन्हा तो पडदा का हलवत आहेत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. हे ही वृत्त वाचा शेतातून परतणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या बैलगाडीला भरधाव कारची धडक:नांदुरा-मोताळा मार्गावर दुर्घटना; दोन्ही बैल गंभीर, शेतकरी ठार
दिवसभर शेतात कष्ट करून बैलगाडीने घराकडे परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. नांदुरा-मोताळामार्गावर लोनवडी गावाजवळ भरधाव कारने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात 70 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यूझाला. ही घटना बुधवार, 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता घडली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
Source link