![]()
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि सत्ताधारी गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार, गृहविभाग आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॅबिनेट मंत्र्याचंच घर सुरक्षित नसेल, तर तिथे सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. ‘हल्ल्याची घटना गृहविभागाचे धिंडवडे उडवणारी’ संजय शिरसाट यांच्या घरावर रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेचा निषेध करत रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. एका पोस्टद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना ही अत्यंत धक्कादायक असून, ती राज्याच्या गृहविभागाचे अक्षरशः धिंडवडे उडवणारी आहे. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचं घरच सुरक्षित नसेल, तर तिथं सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.” तपासाची मागणी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा स्वतःचा अनुभव सांगत रोहित पवारांनी या घटनेच्या सखोल तपासाची मागणी केली आहे. वास्तविक, शहरात जेव्हा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता, त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्तम नियोजन केले होते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण असे असूनही, रात्री घडलेल्या या घटनेच्या तपशीलाबाबत सखोल तपास झालाच पाहिजे,” अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर थेट निशाणा या घटनेवरून रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरही टीका केली आहे. महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत ते म्हणाले, “सत्तेतील मित्रपक्षांसोबत केवळ कठपुतळीचा खेळ खेळणाऱ्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत घडलेल्या या गंभीर घटनेची तरी गांभीर्याने दखल घ्यावी.” घटनेवर मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले? संभाजीनगर शहरात अशा अनेक घटना घडतायेत. दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि सीपींना त्याचे गांभीर्य नाही. माझ्या घरावर हल्ला होतोय आणि पोलिस आयुक्तांचा फोन बंद आहे. एकही डीसीपी किंवा एसीपी उपलब्ध नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता राज्याच्या डीजींना फोन करून माहिती दिली. पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? मी मुख्यमंत्र्यांकडे पोलिस आयुक्तांची नक्कीच तक्रार करणार आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज..
—————- ————– हेही वाचा.. संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर 3 मद्यपींचा राडा:दाेन तरुण ताब्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिरसाटांचा सवाल
शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा
Source link
कॅबिनेट मंत्र्याचंच घर सुरक्षित नाही, तर तिथे सामान्य माणसाचं काय?:मंत्री संजय शिरसाटांच्या घरावरील हल्ल्यावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात