Headlines

निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन:अन्यथा डिसेंबरचे पेन्शन थांबणार



​हिंगोली ​जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, अन्यथा डिसेंबर २०२६ चे मासिक निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नाही, असे आवाहन हिंगोलीचे कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले आहे. ​महाराष्ट्र कोषागार नियम-१९६८ च्या नियम ३३५ नुसार सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी १ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असते. हा दाखला संबंधित पेन्शनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो. राज्य शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ प्रणालीमार्फत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. ​डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना निवृत्तीवेतनधारकांनी आपला बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदवावा. यासोबतच ‘सँक्शनिंग अथॉरिटी’ म्हणून ‘स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘डिस्बर्सिंग अथॉरिटी’ म्हणून ‘महाराष्ट्र स्टेट ट्रेझरी’ या पर्यायांतर्गत ‘हिंगोली’ या कोषागाराचे नाव अचूक निवडणे आवश्यक आहे. ​नागरिकांच्या सोयीसाठी घरबसल्या देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. निवृत्तीवेतनधारक ‘जीवन प्रमाण’ (Jeevan Pramaan) आणि ‘आधार फेस आरडी’ या मोबाईल ॲपचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हयातीचा दाखला जीवन प्रमाण प्रणालीमार्फत किंवा संबंधित बँकेत दाखल केल्याशिवाय डिसेंबर २०२६ चे वेतन जमा होणार नसल्याने, सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी तातडीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या संदर्भात कोषागार कार्यालयामार्फत संबंधित बँकांमध्ये माहिती दिली जात असून बँकेमध्ये ही आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्या बाबत कळविण्यात आल्याचे कोषागार अधिकारी गोरेगावकर यांनी सांगितले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *