![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी निवेदने सादर करण्याची मुदत २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याचे चौकशी
.
विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्यात आला आहे. या प्रकरणांबाबत माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आयोगाने निश्चित केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या प्रारूपात १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन पूर्वी करण्यात आले होते. आता त्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
संबंधितांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत विहित प्रतिज्ञापत्राच्या प्रारूपात आयोगाकडे सादर करावीत. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
तसेच स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्राची प्रत, निवेदन आणि कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुदतीनंतर प्राप्त होणारी प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधितांनी विहित मुदतीत प्रतिज्ञापत्रे सादर करावीत, असे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
आनंद करंदीकर स्मृती दिनानिमित्त परिसंवाद
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,लेखक दिवंगत आनंद करंदीकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ‘जेन झी आणि लोकशाहीची आशादायक वाटचाल’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादात श्रावणी बुबा, श्रीरंजन आवटे आणि प्रशांत कदम सहभागी होणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एड.निशा शिवूरकर असतील.आनंद करंदीकर लिखित ‘विक्री विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन याच कार्यक्रमात भानू काळे यांच्या हस्ते होईल. बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, मोंडकर सभागृह, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन युवक क्रांती दल, शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालय, महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक महासंघ आणि विचारवेध असोसिएशन यांनी केले आहे.