Headlines

संभाजीनगरात चालकाच्या तंद्रीने बस कोसळून 1 ठार, 27 जखमी:पहाटे 4.30, पुलाचे कठडे तोडून ट्रॅव्हल्स बस नाल्यात पडली



पुणे येथून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा संभाजीनगर-जालना रोडवर फत्तेपूर शिवारात शनिवारी (१४ नोव्हेंबर) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अपघात झाला. पुलाचे कठडे तोडून बस उलटली. यात १ जण ठार, एक गंभीर जखमी, तर २७ किरकोळ जखमी झाले. यात साई संजय विघ

.

अपघातावेळी सागर गंगाधरराव सपाटे (३९, रा. अमरावती) हा बस चालवत होता, तर जगन्नाथ थोरात हा बदली चालक होता. सागरवर पुणे ते संभाजीनगरपर्यंत बस चालवण्याची जबाबदारी होती. मात्र, संभाजीनगरच्या पुढे ५ किमीवरील हॉटेलवर थांबू, असे म्हणत त्याने बस पुढे नेली आणि तिचा अपघात झाला.

ऑयस्टर शाळेजवळ अपघात.

  • रात्री ९.३० वाजता – पुणे येथून झिंगप्लसची ट्रॅव्हल्स (एमएच ४३ सीके ०८००) बस नागपूरसाठी रवाना झाली. } रात्री ११ वाजता – शिक्रापूर येथे जेवण्यासाठी थांबा.
  • रात्री दीड ते दोन वाजता – अहिल्यानगर येथे काही प्रवासी उतरले. } पहाटे ४ वाजता – वाळूज येथे काही प्रवासी उतरले. त्या वेळी चालक सागरने काही वेळ बस थांबवून तोंडावर पाणी मारले.
  • पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास – फत्तेपूर शिवारात झोपेची डुलकी आली आणि नियंत्रण सुटून बस थेट कठडा तोडून नाल्यात कोसळली, असे पोलिसांनी सांगितले.

मृत साई २६ ऑक्टोबरला पुण्यात कामाला गेला होता. दिवाळीमुळे बदली चालक, क्लीनर व हेल्पर यांची मागणी जास्त आहे. त्यामुळे तो १५ दिवसांपूर्वी हेल्पर म्हणून १८ हजारांवर कामाला लागला. त्याला सोशल मीडियाची प्रचंड आवड होती, मात्र त्याच्याकडे स्वतःचा मोबाइल नव्हता. इतरांचा मोबाइल घेऊन तो इन्स्टाग्राम पाहत असे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *