Headlines

संवेदनशील कविमन मौनाक्षरे वाचू शकते- जाधव:तिफण स्नेहमेळाव्यात गायत्री घुगे यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन




सध्या सगळ्याच क्षेत्रांत कोलाहल आहे. कुणीच कुणाचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही. अशा वेळी संवेदनशील कवी, लेखकच शांततेतील मौनाक्षरे वाचू शकतो, गायत्री घुगे यांच्या या कवितासंग्रहातील कविता त्याचा प्रत्यय देत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी साखरवेल (ता. कन्नड) येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यात केले. या कार्यक्रमात गायत्री घुगे यांच्या “मौनाक्षर”” या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. या वेळी बोलताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की, तेजस्विनी जाधव यांच्या कवितेत जसा कन्नड तालुक्यातील माती माणसांचा दरवळ आहे, तोच दरवळ गायत्री यांच्या कवितेतून येतो आहे. प्रत्येक माणसाला मौनाक्षरे वाचता आली तर जगणे सहजसुंदर होऊन जाईल. या वेळी कवयित्री गायत्री घुगे यांचे वडील नंदकिशोर घुगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. शिवाजी हुसे यांनी केले. गायत्री घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ज्ञानेश्वर गायके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात लक्ष्मण वाल्डे, भीमराव सोनवणे, समृद्धी गायकवाड, का. का. थोरात, शिवनाथ गायकवाड, सुरेश औटे, दत्ता मोरस्कर, डॉ. संजय गायकवाड, इम्रान शेख, प्रवीण दाभाडे यांच्यासह अनेक कवींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमास जि. प. सदस्य केतन काजे, प्राचार्य विजय भोसले, भगवानगड मेहेगावचे महंत कृष्णानंद महाराज, घाटमाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश घुगे, ॲड. कृष्णा जाधव, उद्योजक डी. एम. घुगे, डॉ. अंबादास सगट, देविदास काळे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. रामचंद्र झाडे, निमंत्रक गजानन घुगे, प्रभात शेळके, चंद्रकांत मुगले, कृष्णा घुगे, किशोर घुगे, प्रवीण दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. शिवाजी हुसे, गजानन घुगे, प्रभात शेळके, लक्ष्मण वाल्डे, ज्ञानेश्वर गायके यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रवीण दाभाडे व किशोर घुगे यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदकिशोर घुगे यांनी आभार मानले. या वेळी विविध मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *