![]()
यंदा दुष्काळामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जमिनीत ओलावा कमी झाला आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धताही मर्यादित आहे. या दुष्काळी परिस्थितीचा फटका आता रब्बी हंगामाला बसला आहे. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र २ लाख ३८ हजार ८२१ हेक्टर असताना, प्रत्यक्षात ऊस वगळून १२ हजार ४२३.९ हेक्टरवर ५.२० टक्के पेरणी झाली आहे. २०२५ मध्ये जूनपासून १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १,०५०.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा २०२६ मध्ये याच कालावधीत केवळ ४४६.२ मिमी पाऊस झाला आहे. पैठण तालुक्यात मागील वर्षी ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत ५०२.६ मिमी पाऊस झाला होता. यंदा पावसातील मोठा खंड आणि परतीच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे जमिनीत ओलावा टिकला नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यानंतर पैठण तालुक्यातील भूजल पातळीत ७.१५ मीटरने मोठी घट झाली असून विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ३९ टक्क्यांच्या पुढे रब्बीची पेरणी झाली होती, मात्र यंदा ती अवघ्या दोन टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. कन्नडमध्ये सर्वाधिक ३,८५९.४ हेक्टर पेरणी झाली असून, खुलताबादमध्ये २,५१७ हेक्टर, सिल्लोड १,०६० हेक्टर, वैजापूर उसासह १,३४४.१ हेक्टर, गंगापूर उसासह १,२३५.२ हेक्टर, संभाजीनगर उसासह १,१४१.५, फुलंब्री तालुक्यात ९०४ हेक्टर तर सोयगाव तालुक्यात एकूण ४८६.५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने जमिनीत ओलावा होता. गतवर्षी ४ महिन्यांत १,०५० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा हीच नोंद ४४६ मिमीवर आहे. म्हणजेच पावसाची ६० टक्के तूट असल्याने जमिनीत ओल नाही. रब्बीची पेरणी केली तरी पिके उगवून येणार नाहीत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी पिकांच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकरी पेरणी करण्यास धजावत नाहीत. आगामी काळात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली तरी यंदा रब्बीच्या एकूण क्षेत्रात विशेष वाढ होईल, असे चित्र दिसत नाही. हरभरा ३,७३०.५ हेक्टर, ज्वारी १,७०१.९ हेक्टर, मका १,५५०.६ हेक्टर, ऊस १,१२०.८ हेक्टर, गहू ९३७ हेक्टरवर तर तृणधान्य व कडधान्याची ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ३९ टक्के पेरणी झाली होती. मात्र, यंदा पावसाअभावी पेरणीची टक्केवारी घटली आहे. विकास पाटील, कृषी अधिकारी, पैठण यंदा रब्बी पेरणी घटणार गतवर्षी १,०५०, यंदा ४४६ मि.मी. पाऊस रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरणीकडे अधिक कल
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:दुष्काळाचा रब्बी हंगामास फटका; आतापर्यंत केवळ 5 टक्केच पेरणी