![]()
यावर्षी अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे व पावसाअभावी सध्या निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचा फटका मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसताना दिसत आहे. कमी पावसामुळे शेतातील पिकांना व फळबागांना मोठा फटका बसताना दिसत आहे. पिके व फळबागा पाण्याअभावी सुकताना दिसत आहे. त्याच सोबत तीव्र पाणी टंचाईमुळे जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. या पाणी टंचाईचा व दुष्काळाचा फटका वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी रवींद्र मोकळे यांच्या पेरूच्या फळबागेला बसताना दिसत आहे. शेतकऱ्यांने मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने पदरच्या पैशाची गुंतवणूक करून आपल्या शेतात वाढवलेली पेरूची फळबाग डोळ्यादेखत पाण्याअभावी दररोज सुकताना दिसत आहे. पण पाण्याअभावी व दुष्काळी परिस्थितीपुढे शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. शेतकरी मोकळे यांनी आपल्या शेतात पेरूची फळबाग गेल्या काही वर्षांपासून मोठया मेहनतीने वाढवली असून, या पेरूच्या बागेवर शेतकरी व कुटुंबाची आर्थिक उत्पन्नाची मोठी आशा अवलंबून आहे. मात्र, यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने आणि दुष्काळ पडल्यामुळे आणि शेतात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पेरूच्या बागेतील बहुतांश झाडे शेतकऱ्याला डोळ्यादेखत सुकताना दिसत आहेत. त्यांनी वाढवलेल्या पेरूच्या बागेतील झाडांची पाने पिवळी पडून वाळत आहेत, तर काही झाडे सुकत आहे. शेतीसाठी केलेली आर्थिक गुंतवणूक, मेहनत आणि भविष्यातील उत्पन्न धोक्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने या गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी रवींद्र मोकळे यांनी शासनाकडे केली आहे. ही सुकणारी पेरूची फळबाग वाचवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी पण मागणी शेतकरी रवींद्र मोकळे यांनी केली आहे. यासाठी शेतकरी रवींद्र मोकळे यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहे. त्यात पेरूच्या फळबागेची महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पाहणी करावी. व पाणीटंचाईमुळे झालेल्या पेरूच्या बागेच्या नुकसानीचा अधिकृत पंचनामा करावा आणि फळबागेसाठी शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांस नुकसानभरपाई मंजूर करावी. शेतकऱ्यास फळबाग वाचवण्यासाठी लागणाऱ्या सिंचनासाठी आर्थिक मदत व बोअरवेलसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे. आणि संकटग्रस्त फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत योजना राबवावी. अशा मागण्या करंजगाव येथील शेतकरी रवींद्र मोकळे यांनी शासनाकडे केल्या आहे.
Source link
मराठवाड्यात पाणीटंचाईचे भीषण संकट:वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे पाण्याअभावी पेरूची बाग सुकली; शेतकरी हवालदिल