![]()
पुण्यात 4 ते 6 डिसेंबरदरम्यान तिसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन होणार आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे संमेलनाध्यक्ष असतील. नंदन बिल्डकॉनचे अध्यक्ष श्यामकांत कोतकर स्वागताध्यक्ष आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री सतीश आळेकर यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांतपाल नितीन ढमाले, क्लबचे अध्यक्ष केदार गोडबोले, कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे, सहकार्याध्यक्ष मोहन चौबळ, मार्गदर्शक राजीव बर्वे आणि रोहन कोतकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रोटरीच्या 20 क्लबचा आयोजनात सहभाग आहे. 4 डिसेंबरला दुपारी साडेचार वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन होईल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित राहतील. रात्री साडेआठ वाजता ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाचा प्रयोग होईल. 5 डिसेंबरला पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांची विशेष मुलाखत होईल. वाचन आणि लेखन संस्कृतीवरील परिसंवाद, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार आणि मुलाखतही होईल. कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. त्याच रात्री योगेश सोमण ‘जयोस्तुते’ हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील सांगीतिक कार्यक्रम सादर करतील. 6 डिसेंबरला सतीश आळेकर यांना पुरस्कार देऊन त्यांची मुलाखत घेतली जाईल. ‘अभिजात दर्जा मिळाला, पुढे काय?’ आणि ‘आजच्या काळात संतसाहित्याची आवश्यकता आहे का?’ या विषयांवर परिसंवाद होतील. कथाकथनानंतर अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत होईल. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहा वाजता संमेलनाचा समारोप होईल.
Source link
पुण्यात 4 ते 6 डिसेंबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन:सुशीलकुमार शिंदे उद्घाटन करणार; डॉ. शरणकुमार लिंबाळे अध्यक्ष, सतीश आळेकर यांना पुरस्कार