Headlines

पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठाचे दागिने चोरले:पौड फाटा चौकातली घटना; घोरपडीत ज्येष्ठाचा 1 लाखांचा मोबाइल हिसकावला




वाहतूक पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाकडील पाच लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना पौड फाटा चौकात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील भुसारी कॉलनीत राहायला आहेत. ते १८ नोव्हेंबर रोजी पौड फाटा चौकातून निघाले होते. काही अंतरावर चोरट्याने त्यांना अडविले. चोरट्याने वाहतूक पोलीस असल्याची बतावणी केली. सिग्नल मोडला असल्याचे सांगून चोरट्याने दंडात्म कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. बोलण्यात गुंतवून संधी साधली चोरट्याने ज्येष्ठांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधली. हातचलाखीने त्यांच्याकडील पाच लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पौड फाटा चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत. मोबाइल हिसकावला पादचारी ज्येष्ठ नागरिकाकडील एक लाख रुपयांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बुधवारी सकाळी फिरायला निघाले होते. बी. टी. कवडे रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील एक लाख रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक एन. बगाडे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *