Headlines

बहिरगाव शिवारात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला:एक मेंढी ठार, परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण




तालुक्यातील बहिरगाव शिवारात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एका मेंढीला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहिरगाव शिवारातील रामकृष्ण विष्णू दापके (रा. बहिरगाव शिवार) यांच्या बहिरगाव ते भोकनगाव रस्त्यावरील गट क्रमांक १०३ मधील शेतात बाबासाहेब हरिभाऊ पिंगट (रा. गव्हाली) यांच्या मेंढ्या बसविण्यात आल्या होत्या. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. यावेळी शेतातील कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केल्याने मेंढ्यांजवळ झोपलेले सर्वजण जागे झाले. त्यांनी आरडाओरड करून बिबट्यास तेथून हुसकावून लावले; मात्र तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार झाली होती. शेतकरी व मेंढपाळांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठी पशुहानी टळली. घटनेची माहिती मिळताच वनमजूर अशोक आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. संबंधित मेंढपाळाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *