Headlines

60 हजार वेतन; ग्रामसेवकाने स्वीकारली 10 हजारांची लाच:मंठा शहरात मानधनाच्या मोबदल्यात घेतली लाच




रोजगारसे वकाच्या मानधनाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक अनिल तुकाराम चव्हाण (४९) याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मंठा शहरातील जालना रोडवरील धनश्री हॉटेल परिसरात करण्यात आली. दरम्यान, या ग्रामसेवकाला ६० हजार रुपये वेतन असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा ग्रामसेवक मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ येथे कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार , तक्रारदार हा ३२ वर्षीय रोजगारसेवक असून, ग्रामपंचायत अधिकारी अनिल चव्हाण यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदाराच्या २४ हजार रुपयांच्या मानधनाचा धनादेश दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने एक हजार रुपये दिले होते, तर उर्वरित पाच हजार रुपये नंतर देण्याचे सांगितले होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराला ४८ हजार रुपयांचा दुसरा मानधनाचा धनादेश देताना चव्हाण यांनी आठ हजार रुपये आणि यापूर्वीचे पाच हजार रुपये असे एकूण १३ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ नोव्हेंबर रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी -तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अनिल तुकाराम चव्हाण यांना पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *