Headlines

अजित दादांच्या अपघातावर भरणे म्हणाले- चौकशीला उशीर तसा संभ्रम वाढतोय:सत्य समोर आले पाहिजे, मफलर मॅन आरोपावरही दिलं उत्तर




राज्यातील वाढती दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी केंद्राची मदत, बारामती विमानतळाचा विकास आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेले राजकारण या सर्वच मुद्द्यांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सविस्तर भूमिका मांडली. अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीला उशीर होत असल्याने गैरसमज वाढत असून, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन सत्य समोर यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दत्तात्रय भरणे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ३१० तालुक्यांत दुष्काळ; केंद्राकडे नव्या दराने फेरप्रस्ताव राज्यातील दुष्काळी स्थितीवर बोलताना भरणे म्हणाले, “पूर्वी ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता, त्यात आता ६ तालुक्यांची वाढ होऊन ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पंचनाम्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एनडीआरएफच्या (NDRF) मदतीच्या हेक्टरी दरात वाढ झाल्याने आता नव्या दराने फेरप्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, केंद्राकडून लवकरात लवकर भरीव मदत मिळेल.” दिवाळीपूर्वी सुमारे ९५ लाख ते १ कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली आहे. ई-केवायसी आणि सामाईक जमिनीच्या कागदपत्रांमुळे वंचित राहिलेल्या सुमारे १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच ही रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांच्या अपघाताचा तपास अन् ‘मफलर मॅन’ वादावर प्रतिक्रिया अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना भरणे म्हणाले, “अजितदादांचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून या अपघाताचे सत्य १०० टक्के समोर आले पाहिजे, असे मला वाटते. तपासाला उशीर होत असल्याने संभ्रम आणि गैरसमज तयार होत आहेत. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अमित शहा यांना तपास लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.” आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेल्या ‘मफलर मॅन’च्या आरोपावर भरणे यांनी फडणवीसांची पाठराखण केली. “कोणासोबत फोटो काढला किंवा कोणी लग्नात मफलर गिफ्ट दिला म्हणजे काहीतरी वेगळा अर्थ होत नाही. अजितदादा आणि फडणवीस यांचे नाते मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण वक्तव्ये न करता तपासातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊ द्यावे,” असे ते म्हणाले. बारामती विमानतळासाठी १३२ कोटींना मंजुरी बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेचा आणि धावपट्टी दुरुस्तीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावर भरणे यांनी सांगितले की, “या विमानतळाच्या विकासासाठी अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. दादांनी स्वतः याचे एस्टिमेट सादर केले होते. आता राज्य सरकारने या कामासाठी १३२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे.” मतदार यादीतून नावे वगळण्याच्या आरोपावर स्पष्ट भूमिका देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवरही भरणे यांनी मत मांडले. “जे मतदार मृत झाले आहेत किंवा ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत, केवळ त्यांचीच नावे यादीतून कमी व्हावीत. जे लोक नोकरीनिमित्त पुणे-मुंबईत राहतात, पण त्यांचे घर, शेती आणि रेशन कार्ड गावात आहे, त्यांची नावे विनाकारण वगळली जाऊ नयेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जावी, हीच महायुती सरकारची भूमिका आहे,” असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. —————- हेही वाचा.. मेरिटवर शिवसेना कालही उद्धवजींचीच होती आणि उद्याही राहील:बारामती विमानतळाचानिधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादांचा अपघात टळला असता –सुप्रिया सुळे

सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. “मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही; मात्र गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना हा पक्ष कालही उद्धव ठाकरे यांचाच होता, आजही आहे आणि उद्याही त्यांचाच राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेला 64 कोटी रुपयांचा निधी, इंदापूरमधील मतदार यादीतून नावे वगळल्याची कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, दुष्काळी परिस्थिती आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *