Headlines

Kishori Pednekar Demands BMC White Paper; Attacks Mahayuti Government



शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेतील विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. 2017 ते 2022 सोबतच 2022 ते 2026 या काळातील कामाचाही हिशोब जनतेसमोर येण्यासाठी ‘व्हाइट पेपर’

.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्ही यासाठीच व्हाइट पेपर मागितला होता आणि त्यांनी लगेच दुसरे म्हटले की 17 ते 22, त्यावर माझे म्हणणे आहे की 17 ते 22 चे व्हाइट पेपर तर द्याच, पण 22 ते 26 हा सुद्धा व्हाइट पेपर द्या. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. कळू दे लोकांना की गेल्या 25 वर्षांत ठाकरेंनी काय केले आणि गेल्या 4 वर्षात या युतीने काय केले.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एसआरएला पत्र दिले होते. की 300 फाइल्सवर एसआरए अनधिकृतपणे काम करत असून यात भ्रष्टाचार असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे मात्र यावर कोणाचेही उत्तर त्यांच्या पत्राला आले नाही. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात मुंबईत अशा गोष्टी येतात तेव्हा ज्यांच्या अंतर्गत हे खाते येते, नगरविकास, एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत हे खाते येते. मग आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले तर त्यांनी आम्हाला उत्तर द्यावे. अश्विनी भिडे ज्यांनी ‘मेट्रो विमन’ म्हणून किताब मिळवला आहे आणि त्या म्हणत असतील तर याला गांभीर्याने घेतले पाहिजे. पण का घेत नाहीयेत? याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे.

मुंबईत सातत्याने प्रदूषणावर वाढ होत आहे आणि यावर महापालिकेत देखील चर्चा होत आहे. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापालिकेने जो आत्ता निर्णय घेतला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. 213 टॅंकरने रस्ते धुतले जाणार आहेत, हा चुकीचा निर्णय आहे, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *