Headlines

रॉडने मारून कन्नडच्या डॉ. तेलींचा खून;‎‎‎मृतदेह पोत्यात बांधून धरणात फेकला:आरोपींची कबुली, शेतकऱ्यानेच सालदाराच्या मदतीने काढला काटा



शेती खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी १‎ लाख ९० हजार रुपयांची रोकड घेऊन कन्नड ‎येथून गोराडखोडा (ता. पाचोरा, जि.‎जळगाव) येथे गेलेले वैद्यकीय व्यावसायिक ‎गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तेली यांनी ‎ज्या शेतकऱ्याकडून जमीन खरेदी केली होती ‎त्या राहु

.

यासंदर्भात पाचोरा येथील डीवायएसपी बापू‎रोहम यांनी सांगितले की, डॉ. संजय तेली यांनी ‎गोराडखोडा येथे जमीन मालक राहुल पाटील‎यांच्या कडून १ कोटीत शेती खरेदीचा व्यवहार‎ केला होता. दोन वर्षांत तेली यांनी पाटील यांना‎ ८० लाख रुपये अदा केले होते. उर्वरित व्यवहार‎पूर्ण करण्यासाठी ते १८ रोजी १ लाख ९० हजार ‎रुपये रोख घेऊन आपल्या कारने (एमएच २०‎सीयू ०४१३) गोराडखोडा येथे पोहोचले. दुपारी‎ साडेतीननंतर तेली यांचा मोबाइल फोन बंद‎ झाला, नंतर नातेवाइकांशी संपर्क तुटला होता.

तेली यांनी पाटील यांच्याकडून जमीन १ कोटी २‎ लाखांत घेतली होती व त्यापोटी ८० लाख ‎रुपयेही दिले होते. मात्र, वर्ग-२ ची जमीन वर्ग-१‎ करण्यासाठी आलेल्या जादा ‘नजराणा”‎खर्चावरून वाद झाला. संतापलेल्या पाटील‎ यांनी झटका मशीनच्या लोखंडी रॉडने डोक्यात‎ मारुन खून केला. सालदार भिल याच्या मदतीने‎ मृतदेह ट्रॅक्टरमधून नेत धरणात फेकला.‎

कार रस्त्यावर उभी, चावी मात्र रसवंती चालकाकडे‎

डॉ. तेली यांची कार पाचोरा ‎रस्त्यावरील रसवंतीजवळ उभी‎ होती आणि चावी रसवंती‎ चालकाकडे आढळली.‎आरोपींनी चावी रसवंतीवरच का‎ दिली? डॉ. तेली व्यवहार पूर्ण‎ करण्यासाठी एकटेच कसे गेले? ‎या व्यवहारील एजंट, मध्यस्थाची ‎भूमिका काय होती याचा पोलिस ‎शोध घेत आहेत. तेली बेपत्ता ‎झाल्याची माहिती कळताच त्यांचा‎ भाचा शिवा तेली शोध घेत होता.‎

लॅबसह बांधकाम व्यवसायात बसवला होता जम‎

डॉ. तेली यांच्या पश्चात वडील,‎पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ‎ असा परिवार आहे. डॉ. तेली ‎यांच्या पत्नीच्या भावाचाही काही‎ वर्षांपूर्वी खून झालेला आहे. संजय‎ तेली यांनी जाधव नर्सिंग होम येथे ‎लॅबसह बांधकाम व्यवसायात जम‎ बसवला होता.

मोबाइलचा सीडीआर व तांत्रिक तपासातून माहिती समोर‎

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले,‎पण निष्पन्न काहीच होत नव्हते. जमीन‎ व्यवहाराची बहुतांश रक्कम शेतकरी ‎राहुल पाटील यांना प्राप्त झालेली‎ असल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई ‎गेलीच नाही. शेवटी पोलिसांनी ‎मोबाइलचा सीडीआर व तांत्रिक तपास ‎सुरू केला. तेली यांचा मोबाइल‎ घटनास्थळीच स्वीच ऑफ झाला ‎असल्याने पोलिसांनी अखेर २२ रोजी‎ शेतकरी राहुल पाटील, सालदार संजय‎ भिल यास ताब्यात घेतले. पोलिसी ‎खाक्या दाखवताच तेली यांचा खून‎ केल्याचे सांगितले.‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *