Headlines

बीडीडी चाळ हा देशातील सर्वात मोठा अर्बन प्रकल्प: वसई-विरार व कर्जतला गेलेल्या गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईतच घरे देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही


“मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहिला पाहिजे आणि त्याला हक्काचे मोठे घर मिळाले पाहिजे, यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पूर्वीच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतील गिरणी कामगार वसई, विरार आणि कर्जतपर्यंत फेकला गेला; मात्र आमच्या सरकारने घेतले

.

नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-1 (Class-1) रूपांतरण आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आणि आगामी काळातील घरांच्या भव्य मोहिमेबाबत महत्त्वाची घोषणा केली.

नागरी निवारा परिषदेअंतर्गत 625 कुटुंबांना घरे

नागरी निवारा परिषदेच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने नागरी निवारा परिषदेचा कायदा करण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळात त्याचा काही प्रमाणात गैरवापर झाला असला, तरी अनेक आदर्श उदाहरणेही घडली आणि त्याअंतर्गत 625 कुटुंबांना हक्काची घरे मिळाली, हे आमचे एक मोठे स्वप्न होते.

300 चौरस फुटांवरून थेट 1200 चौरस फुटांचे घर

आमच्या सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देणारे निर्णय घेतल्यानंतर मुंबईत तब्बल 1600 प्रकल्प मार्गी लागले आहेत. ज्या मुंबईतील सामान्य माणसाला पूर्वी केवळ 300 ते 350 चौरस फुटांच्या छोट्या घरात दाटीवाटीने राहावे लागत होते, त्याला आज 1200 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळाले आहे. मी स्वतः घरांच्या चाव्या देताना ही घरे प्रत्यक्ष पाहिली, तेव्हा या परिवर्तनाची प्रचिती आली, असेही फडणवीस म्हणाले.

बीडीडी चाळ हा भारतातील सर्वात मोठा अर्बन प्रकल्प

मुंबईची ओळख असलेल्या जुन्या वसाहती आणि चाळींच्या पुनर्विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईला खऱ्या अर्थाने ‘मुंबई’ म्हणून ओळख देणाऱ्या ज्या जुन्या वसाहती आहेत, तिथल्या रहिवाशांना त्याच ठिकाणी उत्तम आणि आधुनिक जीवनमान मिळावे असा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे. दक्षिण मुंबईतून बाहेर फेकल्या गेलेल्या गिरणी कामगारांच्या वसाहती त्याच ठिकाणी विकसित केल्या जात आहेत.

कोणत्याही खर्चाविना मोठे घर

आज बीडीडी चाळ पुनर्विकास हा भारतातील सर्वात मोठा नागरी (अर्बन) प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पांतर्गत अवघ्या 120 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला त्याच ठिकाणी 450 ते 600 चौरस फुटांचे अद्ययावत घर पूर्णपणे मोफत दिले जात असून त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचे काम सरकारने केले आहे.

हे जनतेचे आहे आणि जनतेलाच परत करायचे आहे!

मुंबईकरांना मालकी हक्काची घरे देण्याची प्रक्रिया यापुढे अधिक वेगाने राबवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वर्ग-1 रूपांतरणासाठी आणि मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. “हे सर्व जनतेचे आहे आणि जनतेलाच सन्मानाने परत करायचे आहे,” असे सांगत आगामी काळात ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवून जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

——————————————-

हेही वाचा…

पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.