Headlines

पुणे गुन्हेगारीत देशात 5व्या नव्हे तर 9व्या क्रमांकावर: सुप्रिया सुळेंनी आकडेवारी तपासून बोलावे, राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना नाउमेद करू नये -उमेश पाटील


“चार वेळा खासदार राहिलेल्या आणि ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवलेल्या सुप्रिया सुळे जेव्हा एखादे विधान करतात, तेव्हा त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जाते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाचा हवाला देत पुणे शहर गुन्हेगारीत राज्यात 1ल्या आणि देशात 5 व्या क्रमांक

.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची (NCRB) अधिकृत आकडेवारी सादर करत, देशातील 12 महानगरांच्या तुलनेत पुणे गुन्हेगारीत 9 व्या स्थानावर असून मुंबईपेक्षाही सुरक्षित असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेबाबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी मागितलेली माफी स्वीकारत हा विषय संपवण्याची तयारी त्यांनी दर्शवली; मात्र कठीण परिस्थितीत जबाबदारी सांभाळणाऱ्या एका महिलेला दुसऱ्या महिलेने नाउमेद करणे हा अन्याय असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार पुणे 9 व्या स्थानावर

सुप्रिया सुळे यांनी पुणे गुन्हेगारीत देशात 5 व्या क्रमांकावर असल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढण्यासाठी उमेश पाटील यांनी एनसीआरबीच्या (NCRB) 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या सरासरी विश्लेषणाची अधिकृत आकडेवारी माध्यमांसमोर मांडली. दिल्ली, जयपूर, नागपूर, लखनऊ, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई, पुणे, सुरत, चेन्नई आणि कोलकाता या 12 मेट्रोपॉलिटन शहरांमधील 13 प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा दर तपासल्यास पुणे सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. 9वा क्रमांकावर पुण्यात दर 1 लाख लोकसंख्येमागे केवळ 271 गुन्हे दाखल असून पुण्याचा क्राईम रेट मुंबईपेक्षाही कमी आहे.

विद्यार्थी आणि गुंतवणूकदारांमध्ये भीती नको

आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून आणि देशभरातून लाखो विद्यार्थी एमपीएससी (MPSC), यूपीएससी (UPSC), अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात येतात; तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक पुण्यात येत आहे. खोट्या आकडेवारीच्या आधारे पुण्याची बदनामी केल्यास पालक आणि उद्योजकांच्या मनात भीती निर्माण होईल, जे पुण्याच्या लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही.

बारामतीत 2025 मध्ये 62 गंभीर गुन्हे होते, 2026 मध्ये 52 झाले

सुप्रिया सुळे यांनी आपल्याच बारामती मतदारसंघात गुन्हेगारी वाढल्याचे वक्तव्य केले होते, त्यावरही उमेश पाटील यांनी स्थानिक आकडेवारी सादर केली. बारामती शहरातील 13 प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यास, 2025 मध्ये 62 गुन्हे दाखल होते; तर 2026 मध्ये हा आकडा घटून 52 वर आला आहे. म्हणजेच बारामती शहरातील गुन्हेगारी तब्बल 16.13 टक्क्यांनी कमी झाली आहे. देशाच्या आजी-माजी पंतप्रधानांनी ज्या बारामती शहराचे कौतुक करत ‘विकासाचे आदर्श मॉडेल’ म्हणून उल्लेख केला, त्याच बारामतीची बदनामी खासदारांनी करणे योग्य नाही. बीड, बार्शी किंवा अंबरनाथसारख्या इतर ‘अ’ वर्ग नगरपालिकांची तुलना केल्यास बारामतीची स्थिती अत्यंत उत्तम आहे.

सुनेत्रा वहिनींची 35 वर्षांचा अनुभव असलेल्या दादांशी तुलना करणे ही असूया

पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा उमेश पाटील यांनी समाचार घेतला. अजित पवार हे 35 वर्षे सार्वजनिक जीवनात आणि सुमारे 30 वर्षे मंत्री व पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नुकतीच त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. असे असताना त्यांची दादांशी तुलना करणे हा केवळ द्वेष आणि असूया आहे.

रोहित पवारांचा दुटप्पीपणा उघड

एकीकडे अजितदादांबद्दल सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे आईसमान असलेल्या स्वतःच्या काकींबद्दल खालच्या पातळीवर जाऊन विधाने करायची, हा रोहित पवारांचा विरोधाभास आहे. बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनी उभ्या असताना, सर्व खासगी आस्थापनांना सुट्टी असूनही रोहित पवारांनी ‘बारामती ॲग्रो’ची सुट्टी रद्द करून कामगारांना मतदानापासून रोखले होते, अशी आठवणही पाटील यांनी करून दिली.

माफी मागितल्याने हा विषय संपवू

पालकत्वाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे. शब्दांचे बाण निसटल्यावर झालेल्या जखमा लगेच भरत नसल्या तरी, त्यांनी माफी मागितल्याने आमच्या बाजूने हा विषय पुढे न वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

2026 मध्ये परिसीमन आयोगाची मुदत संपल्याने डिलिमिटेशन विधेयक घटनात्मकदृष्ट्या आवश्यक!

शरद पवार गटाने आगामी अधिवेशनासाठी काढलेला ‘व्हीप’ आणि डिलिमिटेशन विधेयकाला दिलेल्या संभाव्य पाठिंब्यावर उमेश पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. लोकसंख्येचा आधार न घेता सर्व राज्यांत सरसकट 50 टक्के जागा वाढणार असतील तर डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, ही सुप्रिया सुळे यांची भूमिका आमच्या पक्षाने यापूर्वीच स्वागतार्ह मानली आहे. परिसीमन आयोगाची मुदत 2026 सालीच संपुष्टात आल्यामुळे नवीन परिसीमन आयोग स्थापन करणे आणि मतदारसंघांची पुनर्रचना करणे ही घटनात्मक अनिवार्यता आहे. त्यामुळे एनडीएबाहेरील अनेक पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत; मात्र या विधेयकाला पाठिंबा दिला म्हणजे ते पक्ष एनडीएमध्ये (NDA) सहभागी होतीलच असेही नाही आणि होणार नाहीत असेही नाही, असे सूचक विधानही उमेश पाटील यांनी केले.

——————————————————-

हेही वाचा…

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाचा व्हीप: अजेंडा माहित नाही, बिलही पाहिले नाही- सुळे, हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात- नताशा आव्हाड

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या आणि संभाव्य डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी ‘व्हीप’ जारी केला आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी अद्याप डिलिमिटेशन विधेयक पाहिले नसल्याचे सांगत भूमिका स्पष्ट करणे टाळले आहे, तर नताशा आव्हाड यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाशी जोडणे दिशाभूल करणारे असल्याची टीका भाजपवर केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.