Headlines

पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया


उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हे

.

“सुनेत्रा वहिनी या माझ्या मोठ्या भावाच्या पत्नी आहेत. पवारांच्या आणि सुळ्यांच्या ज्या संस्कारांत मी वाढले, त्यानुसार आपल्यापेक्षा वयाने व पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला किंवा कार्यकर्त्यांना अनावधानाने वाईट वाटले असेल, तर ‘सॉरी’ म्हणायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही. रोहितच्या वतीने मी अंतःकरणातून हात जोडून माफी मागते आणि दिलगिरी व्यक्त करते,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यासोबतच त्यांनी संसद विशेष अधिवेशनातील डिलिमिटेशन विधेयक, खासदारांना बजावलेला व्हिप आणि संजय राऊत व अखिलेश यादव यांनी केलेल्या टीकेवरही आपली स्पष्ट भूमिका मांडली.

विषय वाढवायचा नाही, अंतःकरणातून सॉरी म्हणते

सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावनिक आवाहन केले. काल रोहित पवारांकडून अनावधानाने काही कमी-जास्त बोलले गेले, त्याबद्दल त्यांनी कालच माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. एकदा माणसाने ‘सॉरी’ म्हटल्यानंतर विषय संपतो. कदाचित ही माहिती आंदोलक महिलांपर्यंत पोहोचली नसेल; मी आणि या महिला अनेक वेळा एका ताटात जेवलो आहोत, आम्ही एकत्र काम केले आहे.

हा आमचा संस्कार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी हात जोडून विनम्रपणे माफी मागते. हा आमच्या पक्षाचा किंवा रोहितचा हेतू नव्हता. सुनेत्रा वहिनी या पूर्ण पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि मी फक्त पुणे शहरातील गुन्हेगारीबाबत राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना जबाबदारी घेण्याची विनंती केली होती; कारण गुन्हेगारी वाढली तर पुण्याची प्रतिमा खराब होऊन परदेशी गुंतवणूक आणि विद्यार्थ्यांवर परिणाम होतो.

पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या; मी फक्त पुणे शहराबद्दल बोलत होते!

पत्रकारांनी या संपूर्ण वादाची सुरुवात आपल्याच वक्तव्यापासून झाली असल्याचा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे यांनी यातील तांत्रिक आणि प्रशासकीय फरक स्पष्ट केला. सुनेत्रा वहिनी अजित पवार या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, त्या केवळ पुणे शहराच्या पालकमंत्री नाहीत. पुणे जिल्हा हा खूप मोठा आहे; मी माझ्या वक्तव्यात फक्त पुणे शहरातील (पुणे सिटी) वाढत्या गुन्हेगारीबाबत भाष्य केले होते.

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली

राज्याचे गृह मंत्रालयाचे (होम मिनिस्ट्री) खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. जर गृहखाते दुसऱ्या कोणाकडे असते, तर मी संबंधित गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असती. मुख्यमंत्रीच गृहमंत्री असल्याने मी त्यांना पुण्यातील गुन्हेगारीची जबाबदारी घेण्यास सांगितले होते.

गुन्हेगारी वाढल्यास पुण्यातील गुंतवणूक आणि शिक्षणावर परिणाम

पुण्यातील गुन्हेगारीकडे केवळ राजकीय नजरेतून न पाहता व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने केवळ शहराची प्रतिमा (इमेज) खराब होत नाही, तर इथल्या परदेशी व देशांतर्गत गुंतवणुकीलाही अडचणी निर्माण होतात. बाहेरून इथे मुले शिकायला येतात; हा संपूर्ण विषय राज्याच्या अर्थकारणाशी जोडलेला आहे. जिथे गुन्हेगारी वाढते, तिथे कोणी गुंतवणूक करेल का? त्यामुळे प्रत्येकाने थोडा मोठा विचार (लार्जर पिक्चर) केला पाहिजे.

पुणे पोलीस आयुक्तांविरोधातील आंदोलनावर प्रतिक्रिया

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा दर वाढत असून ते ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात निदर्शने होत आहेत. या संदर्भात आपण यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून आपली मागणी स्पष्टपणे मांडली असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

डिलिमिटेशनवर भूमिका लोकसभेतच स्पष्ट होईल

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याच्या चर्चांवरून शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सुळे यांनी ‘सिलॅबस’चे उदाहरण देत उत्तर दिले. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यास आता केवळ 72 तास उरले आहेत; मात्र अद्याप सरकारकडून अधिवेशनाचा अधिकृत अजेंडा किंवा विधेयकाचा मसुदा आमच्या हातात आलेला नाही. परीक्षा देण्यासाठी कोणता विषय आहे याचा ‘सिलॅबस’च माहीत नसेल, तर अभ्यास कशाचा करणार? त्यामुळे डॉक्युमेंट हातात आल्याशिवाय आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय मी कसे बोलणार?

प्रत्येक अधिवेशनापूर्वी व्हिप बजावणे ही शिस्तीची पद्धत

आमचा पक्ष शिस्तीचा असून प्रत्येक संसदीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर होताच आमचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे हे खासदारांना व्हिप बजावतात; तो केवळ या अधिवेशनापुरता नसून नेहमीचीच प्रक्रिया आहे. पहलगाम हल्ल्यावेळी ज्याप्रमाणे शरद पवार सर्वप्रथम देशाच्या बाजूने उभे राहिले आणि नंतर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची एकच भूमिका ठरली, तसेच या बिलाचा मसुदा आल्यावर आम्ही अभ्यास करू आणि पक्षाची अधिकृत भूमिका थेट लोकसभेच्या पटलावरच दिसेल.

संजय राऊत आमचे मोठे भाऊ, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार

डिलिमिटेशनला पाठिंबा देणारे 21 व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील आणि इतिहास त्यांची नावे लक्षात ठेवेल, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर सुळे यांनी शांतपणे प्रतिक्रिया दिली. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. संजय राऊत हे आमचे मोठे भाऊ तसेच महाराष्ट्र आणि देशाचे मोठे नेते आहेत; त्यामुळे त्यांना मनमोकळेपणाने बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते माझ्यावर टीका करत आहेत असे मला अजिबात वाटत नाही. अखिलेश यादव यांच्याशीही माझे कालच बोलणे झाले असून, ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी महागाई, शेतकरी, पाणी आणि प्रत्येक राष्ट्रीय प्रश्नावर माझा रोज संवाद सुरू असतो.

रोहिणी खडसेंचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदल

पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष पदावर रोहिणी खडसे यांच्या जागी नवीन नियुक्ती का झाली, या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, प्रत्येक पक्षात पदाधिकाऱ्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ (टेन्युअर) निश्चित असतो. जयंत पाटील यांच्यानंतर शशिकांत शिंदे, मेहबूब शेख यांच्या जागी नवीन अध्यक्ष आले, त्याचप्रमाणे रोहिणी खडसे यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने हा संघटनात्मक बदल करण्यात आला आहे.

———————————————————

हेही वाचा…

पुणे गुन्हेगारीत देशात 5व्या नव्हे तर 9व्या क्रमांकावर: सुप्रिया सुळेंनी आकडेवारी तपासून बोलावे, राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना नाउमेद करू नये -उमेश पाटील

“चार वेळा खासदार राहिलेल्या आणि ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवलेल्या सुप्रिया सुळे जेव्हा एखादे विधान करतात, तेव्हा त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जाते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाचा हवाला देत पुणे शहर गुन्हेगारीत राज्यात 1ल्या आणि देशात 5 व्या क्रमांकावर असल्याची धादांत खोटी माहिती देऊन त्यांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची आणि स्वतःच्या बारामतीची मोठी बदनामी केली आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आकडेवारीनिशी जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.