![]()
उपराजधानीत एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून पुन्हा एकदा टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. कुख्यात गुंड सुमित चिंतलवार याचा साथीदार पवन ऊर्फ मिहीर राजेंद्र मिश्रा याच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला चढवला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा परिसरातील
.
मिळालेल्या माहितीनुसार एमडी तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून हा वाद उफाळून आला. हल्ल्यापूर्वी आरोपींनी मिहीरला अनोळखी क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पाच जणांच्या टोळक्याने त्याला गाठून प्राणघातक हल्ला केला. जखमी मिहीर मिश्रा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एमडी विक्री, अवैध शस्त्र बाळगणे आणि धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी सुमित चिंतलवारसोबत एमडी तस्करीप्रकरणी त्याला अटकही झाली होती.
दरम्यान, ड्रग्स तस्करीसोबतच वाहतूक व्यवसायावरून मिहीरचा शुभम महल्ले याच्याशी वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली असून, बेलतरोडी पोलिस या दोन्ही कोनांतून प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नागपुरात सोनेगावच्या अमराई जंगलात तरुणीवर अत्याचार
सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात सोमवारी रात्री फिरण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावले आणि त्यानंतर तरुणीवर जबरदस्ती केली. तसेच तिच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेत व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपी पसार झाला. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा आणि निर्जन परिसरातील पोलिस बंदोबस्ताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काय आहे नेमका घटनाक्रम?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत अमराई जंगल परिसरात गेली होती. दोघे निर्जन ठिकाणी असताना आरोपीने त्यांना गाठले आणि प्रियकराला मारहाण करून तेथून पिटाळले. त्यानंतर तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला व काही व्हिडिओ चित्रित केले. जाताना त्याने तरुणीकडील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.