डिलिमिटेशन विधेयक मंजूर व्हावे, असे संजय राऊत यांच्याही मनात आहे; मात्र त्यांना बोलताना केवळ विरोध करावा लागत आहे. डिलिमिटेशनमुळे विकास साधण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी छोटे मतदारसंघ आवश्यक आहेत, याची जाणीव त्यांनाही
.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकातून महिलांना आरक्षण मिळणार असून, विकासकामांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसाठी मतदारसंघ अधिक सुटसुटीत होणार आहेत. राज्यातील 50 टक्के मतदारसंघ वाढल्यास सध्या 4 ते 5 लाख मतदारसंख्या असलेले विधानसभा मतदारसंघ लहान होतील. त्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवता येतील.

महाराष्ट्रातील खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी जर डिलिमिटेशन विधेयकाला साथ दिली किंवा त्याच्या बाजूने मतदान केले, तर त्यांनी लोकप्रतिनिधींच्या खऱ्या मागणीला मतदान केले असे म्हणता येईल. हा काही एनडीएचा अजेंडा नाही, तर हा सर्व लोकप्रतिनिधींचा अजेंडा आहे. लोकप्रतिनिधींचे मतदारसंघ अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांनी केलेला हा एक चांगला प्रयत्न ठरेल. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनेसुद्धा यावर विचार केला पाहिजे. राहुल गांधी यांनी आपल्या खासदारांची नेमकी इच्छा काय आहे, हे विचारून घेतले पाहिजे. नागपूरच्या काँग्रेस खासदारांनाही हे विधेयक मंजूर व्हावे असे वाटते; मात्र ‘राहुल गांधी आमच्या इच्छा मारत आहेत,’ असे त्यांनीच मला सांगितल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. विदर्भ आणि महाराष्ट्रातील खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने आहेत, असेही ते म्हणाले.
विधेयकामुळे देशात मोठे परिवर्तन घडणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक खासदार आणि लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील कामकाज सुलभ व्हावे, यासाठी या विधेयकाच्या बाजूने आहे. केवळ राजकीय विरोध करायचा म्हणून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला जात आहे. मात्र या विधेयकामुळे देशात मोठे परिवर्तन घडणार आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा. हे विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राऊतांनी अशी विधाने करू नयेत
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुम्ही स्वतः खासदार राहिले आहात. अशा स्थितीत प्रत्येक खासदाराला 150 कोटी रुपयांचा आरोपी ठरवणे राऊत यांना शोभत नाही. सर्वच खासदार पैसे घेणार आहेत, असे सरसकट विधान करणे हे लोकप्रतिनिधींच्या सार्वजनिक जीवनावर मोठे लांछन आहे. राऊत यांनी अशी विधाने करू नयेत आणि खासदारांची माफी मागावी. सर्वसामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींना हे विधेयक संमत व्हावे, असेच वाटते.
ळू माफियांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर सरकारकडून कठोर कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून, वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वृत्त वाचा
डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी:लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव; विधेयकाला पाठिंबा देणारे इतिहासात ‘गद्दार’ ठरतील- संजय राऊत

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना देशाची जनता इतिहासात ‘गद्दार’ म्हणून लक्षात ठेवेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशाचे विभाजन होत असताना, लोकसभेचे महत्त्व कमी केले जात असताना आणि जनतेकडून सत्ता हिरावून घेतली जात असताना जे खासदार सरकारच्या बाजूने मतदान करतील, त्यांना जनता गद्दारच मानेल, असे ते म्हणाले. हे विधेयक राष्ट्रविरोधी असून यामुळे लोकसभेचे महत्त्व कमी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर