डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना देशाची जनता इतिहासात ‘गद्दार’ म्हणून लक्षात ठेवेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशाचे विभाजन होत असताना, लोकसभेचे महत्त्व कमी केले जात असताना आणि जनतेकडून सत्ता हिरावून घेतली जात असताना
.
संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली हे डिलिमिटेशन विधेयक लादण्याचा प्रकार सुरू आहे. 540 खासदारांच्या जागी 850 हून अधिक खासदार लोकसभेत कोंबण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. 2029 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. आतापर्यंत ईव्हीएम (EVM) आणि मतचोरीच्या माध्यमातून त्यांनी विजय मिळवला, मात्र या दोन्ही प्रकारांचा भांडाफोड झाल्याने आता डिलिमिटेशनच्या नावाखाली हवे तसे मतदारसंघ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून 2029 मध्ये पुन्हा सत्तेत यायचे आणि त्यानंतर कधीही सत्ता सोडायची नाही, अशी रचना सत्ताधारी करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

अद्याप सत्ताधाऱ्यांकडे बहुमत नाही
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेत 860 खासदार केले, तर काही लोकांना चंद्रावर बसवावे लागेल. 2026 साली जेव्हा हे विधेयक मांडले गेले होते, तेव्हा सत्ताधाऱ्यांकडे पुरेसे बहुमत नसल्याने ते कोसळले आणि त्यानंतर संसद स्थगित करण्यात आली होती. आता 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येक खासदाराचा भाव 150 कोटी रुपये ठरला आहे. 2029 मध्ये सत्ता मिळवण्यासाठी खासदारांची किंमत दीडशे कोटी करण्यात आली असून, जे खासदार या विधेयकाला मतदान करतील त्यांनी दीडशे कोटी रुपये घेतले आहेत, हे जनतेने लक्षात ठेवावे. या विधेयकासाठी लागणारे 362 खासदारांचे बहुमत सरकारला अद्याप जमवता आलेले नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.
..काही खासदारांपर्यंत रक्कम पोहोचली
संजय राऊत म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी झारखंड आणि आंध्र प्रदेशमधील दोन खासदारांवर सोपवण्यात आली असून ते या व्यवहारासाठी काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर हे विधेयक आणण्याची कोणाची हिंमत झाली नसती. तसेच, शरद पवार यांची प्रकृती चांगली असती, तर त्यांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नसते; सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. काही खासदार विकले जाण्यास तयार आहेत, तर काहींपर्यंत रक्कम पोहोचली असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना त्यावर कोणीही बोलायला तयार नाही; मात्र दुसरीकडे खासदारांची संख्या 860 करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.