Headlines

‘सहकार विकास’कडे सत्ता: सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; 19 पैकी 18 जागांवर एकहाती वर्चस्व



सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 18 जागांवर भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलने बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, मोहिते पा

.

आज 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यापूर्वीच 10 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे 9 जागांसाठी झालेल्या थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या 9 जागांपैकी 8 जागा भाजप पुरस्कृत पॅनलने जिंकल्या, तर 1 जागा मोहिते पाटील गटाच्या खात्यात गेली. शेवटच्या टप्प्यात बँक व पतसंस्था गटात भाजपचे मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली, ज्यामध्ये मनीष देशमुख यांनी बाजी मारली.

माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी गटातून स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले असून त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार शहाजीराजे देशमुख यांचा पराभव केला. तर सांगोला विविध कार्यकारी सोसायटी गटातून शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजप पुरस्कृत पॅनलच्या तिकिटावर निवडून आले; त्यांनी मोहिते पाटील पॅनलचे संजय इंगोले यांना मात दिली.

काल पार पडलेल्या मतदानात एकूण 2596 पैकी 2257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 86.94 टक्के मतदानाची नोंद केली. प्रचार काळात बेकायदेशीर कर्ज वाटप आणि संस्था बुडवण्यावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *