Headlines

आमदारांच्या कुत्र्याचा महिन्याचा खर्च 5000 रुपये: विदर्भात 11 महिन्यांत 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरी मुख्यमंत्र्यांचे लक्ष गोकुळ डेअरीवर; अभिजित दिपकेंची टीका


“शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5000 रुपये मदत देऊन तुम्ही त्यांना 5000 रुपयांत दिवाळी साजरी करा असे सांगता; प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना ही मदतही मिळालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा थेट प्रश्न आहे की, तुमची दिवाळी 5000 रुपयांत साजरी होते

.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या ‘पब्लिक’ अभियानांतर्गत त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि जिल्हा परिषद शाळांची पाहणी करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

विदर्भात 11 महिन्यांत 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर मुद्द्यावरून अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सरकार बड्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करते, मात्र बळीराजाची कर्जमाफी करत नाही. एका बाजूला मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे, तर दुसरीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी

गेल्या अवघ्या 11 महिन्यांत एकट्या विदर्भात 750 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचे सुपुत्र असूनही त्यांचे लक्ष शेतकऱ्यांचे जीव वाचवण्याऐवजी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध डेअरीवर कब्जा कसा करता येईल याकडे आहे. एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही मुख्यमंत्र्यांना आपले अपयश जाणवायला हवे. जर तुम्हाला गोकुळची दूध डेअरीच सांभाळायची असेल आणि गोकुळचे दूधच विकायचे असेल, तर तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन खुर्ची खाली करा आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री होऊ द्या, असे आव्हान दिपके यांनी दिले.

स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही पत्र्याच्या शाळा आणि बाथरूमला छत-दरवाजे नाहीत

‘पब्लिक’ अभियानांतर्गत अभिजित दिपके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील धोत्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेची दुरवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. धोत्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कोणतीही शिस्त राहिलेली नाही; शिक्षक दुपारी 12 वाजता शाळेत येतात आणि वेळ होण्यापूर्वीच केव्हाही निघून जातात.

वर्गात बांबू, स्वच्छतागृहांची दुरवस्था

शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ बाथरूमची सोय नाही; बाथरूमला ना छत आहे, ना दरवाजे. वर्गात चक्क बांबू ठेवलेले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण होत आली तरी आजही ग्रामीण भागात पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवाव्या लागत आहेत. ना शेतकऱ्यांसाठी काही होत आहे, ना शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही केले जात आहे. हे सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल, असा इशाराही अभिजित दिपके यांनी दिला.

——————————————————

हेही वाचा…

शरद पवारांचा पक्ष महायुतीत आल्यास निश्चितच स्वागत: सध्या त्यांचा कल तिकडेच दिसतोय, गुलाबराव पाटलांचे विधान, संजय राऊतांवरही साधला निशाणा

“राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा मीदेखील वृत्तपत्रे आणि माध्यमांद्वारे ऐकत आहे. जोपर्यंत ते अधिकृत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही; मात्र सध्या त्यांचा कल नक्कीच तिकडे दिसतोय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.