Headlines

गोळीबारानंतर सुनेत्रा पवारांनी पोलिसांची बैठक घेतली: पुण्यात गस्त अन् नाकाबंदी वाढवा म्हणत गुन्हेगारांना वेळीच अटकाव करण्याचे आदेश



पुणे शहरातील गोळीबाराच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पोलिस यंत्रणेची बैठक घेत कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या या बैठकीला पुणे शहर पोलिस आयु

.

पुणे शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात गोळीबार, हल्ले, टोळीयुद्ध आणि अन्य गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिस यंत्रणेची तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात घडलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती घेत संबंधित प्रकरणांतील तपासाची सद्यस्थितीही जाणून घेतली.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांना वेळीच अटकाव करावा. गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिस गस्त, नाकाबंदी आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी समन्वयाने काम करावे. शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोळीबाराच्या घटनेनंतर पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या तातडीच्या बैठकीमुळे पोलिस यंत्रणा आता कोणत्या उपाययोजना करते आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *