![]()
परशुराम आर्थिक विकास महामंडळातर्फे सुरवातीला वैयक्तिक आणि गट व्याज परतावा योजना सुरूवात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना केवळ कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष कॅप
.
नियोजन विभागांतर्गत असलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पात्र उमेदवारांचे अर्ज संकलित करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवार २६ रोजी येथील नियोजन भवनात विशेष शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजना व गट कर्ज योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, संकलन करणे तसेच अर्जांची छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. यासोबतच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महामंडळाच्या माध्यमातून समाजातील पात्र घटकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमुळे महामंडळाच्या योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार झाली आहे.