![]()
भारतीय लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या भारतीय संविधानाच्या स्वीकार दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी (दि. २६) संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठाच्या संपूर्ण कार्यक्षेत्राती
.
नागपूर कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विशेष कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “संविधान हे केवळ शासनव्यवस्थेचे मार्गदर्शक दस्तऐवज नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्कांचे, कर्तव्याचे आणि सामाजिक जबाबदारीचे अधिष्ठान आहे. संविधानातील मूल्यांचा केवळ औपचारिक स्वीकार न करता त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कृतीतून अंगीकार करावा,” असे आवाहन त्यांनी केले. अकोला येथील विद्यापीठ मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. देवानंद पंचभाई आणि कुलसचिव प्रीती रोडगे यांच्या उपस्थितीत उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. विस्तार शिक्षण संचालनालयात संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी उपस्थितांसह वाचन करून शेतकरी हितासाठी आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानिक मूल्यांची जाणीव ठेवून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याच अनुषंगाने अकोला येथील विविध महाविद्यालये व संस्थांमध्येही सामूहिक वाचन उपक्रम पार पडले. यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांबळे, कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर, वनविद्या महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुचिता गुप्ता, पदव्युत्तर शिक्षण संस्थेत सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेषराव चव्हाण, तर निम्न कृषी शिक्षण संस्थेत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र काटकर व डॉ. निशांत शेंडे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती. संविधान दिनानिमित्त विद्यापीठाच्या सर्व संस्थांमध्ये राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून संविधानाविषयी आदर, लोकशाहीप्रती निष्ठा आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचा संदेश देण्यात आला.