Headlines

कार्तिकी यात्रेत 7 लाखांहून अधिक भाविक विठूचरणी: दररोज सरासरी 48,753 भाविकांची उपस्थिती; एकादशीला 59,571 भाविकांनी घेतले दर्शन



कार्तिकी यात्रेनिमित्त १० ते २४ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या यात्रा कालावधीत एकूण ७ लाख ३१,२९८ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यामध्ये ३ लाख १४,२२ भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा, तर ४ लाख १७,२७६ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतल्याची माहित

.

यंदाच्या कार्तिकी यात्रेत भाविकांना सुलभ, सुरक्षित व शिस्तबद्ध दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. दर्शन व्यवस्थेसाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच दर्शन व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पदस्पर्श दर्शन व मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांगा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. याशिवाय दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या नोंदविण्यासाठी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दर्शन रांगेतील भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बसण्याची व्यवस्था, मॅट, पिण्याचे स्वच्छ पाणी, खिचडी वाटप आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आवश्यक ठिकाणी पंखे व कुलर बसविण्यात आले होते. भाविकांना दर्शन रांगेतूनच श्रींचे दर्शन घेता यावे, यासाठी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात्रा कालावधीत भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे दर्शन सुलभ झाले.

या १५ दिवसांच्या कालावधीत पदस्पर्श दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या एकूण भाविकांच्या ४२.९४ टक्के, तर मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या ५७.०६ टक्के इतकी होती. पदस्पर्श दर्शनाच्या तुलनेत मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या १ लाख ३ हजार २५४ ने अधिक होती. यात्रा कालावधीत दररोज सरासरी ४८ हजार ७५३ भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *