Headlines

सारोळेत ठिबकद्वारे फुलवली ‘गोदावरी’ तूर, शास्त्रज्ञ पाहणीसाठी बांधावर: सारोळेतील शेतकरी सूर्यकांत गाटे यांनी टंचाईमध्ये पिकवली 15 एकरांवर तूर



पाऊस कमी, पाण्याची उपलब्धता मर्यादित आणि हवामानातील अनिश्चितता अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतीचे गणित जुळवणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग सारोळे (ता. बार्शी) येथील शेतकरी स

.

दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने या तूर प्रक्षेत्राला भेट दिली. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक पाटील, रोगशास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप आणि शास्त्रज्ञ डॉ. विष्णू गीते यांनी पिकाची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव अतुल सराफ, सचिन भोजने, प्रदीप साळुंखे, बबन हेडे, उत्तम गाटे,शशिकांत गाटे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सुधारित वाणाच्या लागवडीचे केले आवाहन डॉ. दीपक पाटील म्हणाले, आगामी हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘गोदावरी’ तूर वाणाची लागवड करावी. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि शास्त्रीय मार्गदर्शन यांचा योग्य समन्वय साधल्यास कमी पावसाच्या परिस्थितीतही तूर शेतीला नवी दिशा मिळू शकते. पारंपरिक चौकटीबाहेर पडून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा गाटे यांचा प्रयत्न आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *