![]()
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्डसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद
.
याप्रसंगी नगरसेवक सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, इंजि. परिमल निकम, प्रा. माणिक विधाटे, प्रा. जयंत गायकवाड, अमित काळे, सिद्धार्थ आढाव, विलास साठे, विजयराव भांबळ, महेश भोसले, प्रा. डी.आर. जाधव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, प्रा. एल.बी. जाधव, अजय पाखरे, लक्ष्मण माघाडे, निखिल साळवे, गौतम म्हस्के यांच्यासह आंबेडकरी समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश बनसोडे म्हणाले, संविधान दिन हा सामाजिक बांधिलकी आणि आपल्या अधिकारांच्या जाणीवेचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे आपल्या आयुष्याचे दिशादर्शक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट निर्माण केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानातील मूल्यांचे जतन, पालन आणि प्रसार करावा.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मान मिळावा, सामाजिक सलोखा टिकावा आणि लोकशाही अधिक सक्षम व्हावी, हा संविधानाचा मूलभूत विचार आहे. संविधानाचे वाचन करण्याबरोबरच त्यातील मूल्ये आचरणात आणणे हीच खरी संविधाननिष्ठा आहे.
संविधान हे एका समाजाचे नसून संपूर्ण भारतीयांचे आमदार संग्राम जगताप म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देण्याचे ऐतिहासिक कार्य संविधानाने केले. संविधान हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण भारतीयांचे आहे. संविधानामुळे देशात समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला आहे. या संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. यावेळी आमदार जगताप यांनी मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.