Headlines

ठेंगोडा शाळेत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे: भूकंप, पूरात घ्यावयाच्या खबरदारीचे प्रात्यक्षिक



आपत्तीच्या प्रसंगी सतर्कता, सुरक्षितता आणि प्रसंगावधान राखून स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माध्यमिक विद्यालय, ठेंगोडा येथे बुधवारी आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. य

.

प्रशिक्षणादरम्यान विविध आपत्तींच्या परिस्थितीत कशा प्रकारे बचावकार्य करावे, याची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. प्रमुख पाहुण्या व प्रशिक्षक म्हणून क्रांती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक के. एच. निकम व ज्येष्ठ शिक्षिका इंगळे यांच्या हस्ते क्रांती सोनवणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका खैरनार ए. व्ही. यांनी केले, तर शिक्षक निकम एस. बी. यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळाला. तसेच संकटसमयी स्वतःचा बचाव करण्यासोबतच इतरांना मदत करण्यासाठी आवश्यक कौशल्यांची ओळख मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *