Headlines

नैताळेत गावठी कट्ट्यातून गोळीबार: एक जण गंभीर जखमी, संशयित फरार



राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच निफाड तालुक्यातील नैताळे येथे गोळीबाराची घटना घडली आहे. जलकुंभाजवळ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत श्रावण पिंपळे हा तरुण ग

.

श्रावण पिंपळे व राहुल वाघमारे हे दोघे नैताळेत पाण्याच्या टाकीजवळील वडाच्या झाडाखाली थांबले होते. यावेळी संभाजीनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचदरम्यान गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात श्रावण पिंपळे याच्या पाठीमागील बाजूस कमरेजवळ गोळी लागली. त्याला निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संभाजीनगर गुन्ह्यातील संबंधांचा शोध सुरू संशयिताच्या शोधासाठी निफाड पोलिसांकडून पथके रवाना केली आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण काय, संभाजीनगर येथील गुन्ह्याचा या घटनेशी काय संबंध आहे. व वापरण्यात आलेला गावठी कट्टा कुठून आणला याचा तपास आता निफाड पोलिस करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *