![]()
संतांची भूमी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणच्या विकासात गोदावरी नदीवरील आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची भर पडत आहे. श्री संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील पालखी ओटा ते जुने कावसान यांना जोडणाऱ्या २५ कोटी रुपये खर्चाच्या भव्य पुलाचे ब
.
केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या पुलासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू आहे. ९०० फूट लांबी, ४० फूट रुंदी आणि गोदावरी पात्रापासून ४५ फूट उंची असलेल्या या पुलाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पैठण शहर आणि जुने कावसान परिसरातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या जुने कावसान येथून पैठण शहरात येण्यासाठी नागरिकांना सुमारे पाच किलोमीटरचा वळसा घालून जवळपास २० मिनिटांचा प्रवास करावा लागतो. नवीन पुलामुळे हे अंतर सुमारे तीन किलोमीटरने कमी होऊन काही मिनिटांत शहरात पोहोचणे शक्य होईल. नदीपात्रातून होडीचा आधार घेण्याची किंवा लांबचा रस्ता पकडण्याची गरजही कमी होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. जवळचा मार्ग राहणार पुलाचा फायदा केवळ भाविक व वारकऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही. जुने कावसानमधील शेतकऱ्यांना शेतीमाल शहरात आणण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होईल. दूध उत्पादक, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च वाचेल. स्थानिक बाजारपेठेशी संपर्क वाढून आर्थिक उलाढालीला चालना मिळेल.
गर्दी व्यवस्थापनास होणार मदत नाथषष्ठीला लाखो भाविक, दिंड्या आणि वारकरी पैठणमध्ये येतात. पालखी ओटा ते जुने कावसान यांना थेट जोडणारा हा पूल नाथषष्ठी सोहळ्याच्या दृष्टीने सोयीचा ठरेल. जुने कावसान परिसरात दिंड्यांचे मुक्काम होत असल्याने वारकऱ्यांना नदीचा अडथळा पार करणे सोपे होईल.
{राजेंद्र बोरकर, अभियंता