![]()
गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटनांमुळे बीड जिल्हा गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता थेट शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेवराई तालुक
.
आहेर चिंचोली परिसरातील सिंधफना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या माफियाचे काही साहित्य तलाठी विलास तपसे यांनी जप्त केले होते. कर्तव्य बजावताना केलेल्या या कारवाईचा राग धरून संबंधित वाळूमाफियाने थेट कार्यालयात घुसून जप्त केलेले साहित्य परत देण्याची मागणी केली. तपसे यांनी नकार देताच आरोपीने हातातील लोखंडी रॉडने त्यांना बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतील तपसे यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महसूल कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
या हल्ल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा महसूल कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. संबंधित वाळूमाफियावर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
निलंग्यात अवैध सावकारीप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल
दरम्यान, मराठवाड्यातीलच लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची 30 ते 40 टक्के अव्वाच्या सव्वा व्याजदराने आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सहकार विभागाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन बेकायदेशीर कर्जवाटप केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याने अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.