![]()
सिंहस्थानिमित्ताने मंदिर कॉरिडॉर, दर्शनपथासह विविध कामे पूर्ण करण्यासाठी १ डिसेंबरपासून पुढील दोन ते अडीच महिने त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव एमएसआयडीसीने धर्मादाय आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरणाला सादर केला आहे.
.
दरम्यान, दर्शन बंदबाबत निर्णय हा जिल्हाधिकारीच घेतील. निर्णयापूर्वी आठ दिवस आधी भाविकांनाही सूचित केले जाणार असल्याचे सिंहस्थ प्राधिकरणाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच भाविकांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने दर्शनबंदीचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र, ऑनलाइन दर्शन सुविधेचा पर्याय विचारात घेतला जाईल, असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.
कायदेशीर पेच टाळण्यासाठी हे मुद्दे अनिवार्य आहेत
- ठोस कारण व कालावधी : मंदिर बंद ठेवण्यामागील कारणे, कालावधी स्पष्ट करणे बंधनकारक.
- प्राधिकरणाचा लेखी आदेश : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, २०२५ च्या कलम ८ नुसार ठरावासह लेखी निर्देश घ्यावेत. खटले टाळावेत म्हणून ऑनलाइन दर्शनाचा पर्याय.