![]()
सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात सोमवारी रात्री फिरण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावले आणि त्यानंतर तरुणीवर जबरदस्ती क
.
काय आहे नेमका घटनाक्रम?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत अमराई जंगल परिसरात गेली होती. दोघे निर्जन ठिकाणी असताना आरोपीने त्यांना गाठले आणि प्रियकराला मारहाण करून तेथून पिटाळले. त्यानंतर तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला व काही व्हिडिओ चित्रित केले. जाताना त्याने तरुणीकडील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
घाबरून जोडप्याने सुरुवातीला कोणतीही वाच्यता केली नाही
या प्रकारामुळे घाबरलेल्या जोडप्याने सुरुवातीला कोणतीही वाच्यता केली नाही. मात्र, कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पीडितेने सुमारे २४ तासांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, चित्रीकरण आणि लूटमारीचा गुन्हा नोंदवला असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेलाही तपासात समाविष्ट केले आहे.