Headlines

बीडला प्राध्यापकाकडूनच मेडिकलच्या विद्यार्थिनीशी लगट करून लैंगिक छळ: 5 वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी, आरोपीस अटक



होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारी २२ वर्षीय विद्यार्थिनी पीसीओडीच्या आजारपणामुळे नियमित तपासणीसाठी महाविद्यालयाच्याच रुग्णालयात गेली असता, महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉक्टर अनिस अहमद याने तिचा विनयभंग करत लैंगिक छळ

.

हा प्रकार कुणाला सांगितल्यास परीक्षेत कमी गुण देईन, ५ वर्षे एकाच वर्गात ठेवेन, अशी धमकी दिली. अखेर या विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरून डॉक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

डॉ. अहमद याने विद्यार्थिनी नियमित तपासणीसाठी गेल्यावर तिच्याशी लगट केली. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर तो म्हणाला, हा प्रकार कुणाला सांगितलास तर परीक्षेत कमी गुण देईन, एकाच वर्गात ५ वर्षे बसवेन, पास होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.

११ महिन्यांत चार वेळा असे गैरवर्तन केले

पीडित विद्यार्थिनीने डॉ. अनिस अहमदकडून होणारा हा छळ ११ महिने सहन केला. जानेवारी २०२६ मध्ये पहिल्यांदा तपासणीच्या बहाण्याने डॉ. अनिसने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ सुरू केला. त्यानंतर उपचाराच्या निमित्ताने सातत्याने तपासणीला बोलावून ११ महिन्यांत ३-४ वेळा त्याने अशाच प्रकारे गैरवर्तन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *