![]()
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात बुधवारी ६-७ जणांच्या टोळक्याने गोळीबार करत मंदार किवळे (३५) याच्यावर पालघन, कोयत्याने ८ सेकंदात दहा वार करून त्याचा पंजा, अंगठा छाटला होता. या प्रकरणात नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील सहा जणांना
.
दोन हल्लेखोरांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. एक हल्लेखोर विधिसंघर्षग्रस्त आहे. ४ ते ५ आरोपी फरार आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. वर्षभरापूर्वी जमिनीच्या वादातून कात्रज येथे शुभम चव्हाण याचा खून झाला होता. त्याच्या पार्थिवासमोरच हल्लेखोरांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. हल्ल्यामागे केवळ बदला नव्हे तर संघटित गुन्हेगारीचा संशय असल्याने आरोपींवर मोक्का लावण्याची तयारी सुरू आहे.
हल्ल्याच्या तयारीसाठी घेतली होती बैठक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ नोव्हेंबरला जामिनावर सुटलेला मंदार बुधवारी न्यायालयात येणार असल्याची माहिती अक्षय चव्हाणला मिळाली. त्यानंतर त्याने कात्रज येथील स्वत:च्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हल्लेखोरांची मंगळवारी रात्री बैठक घेतली. तेथे न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच हल्ला करावा, असा कट रचण्यात आला.