जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये घोटाळा झाला आहे. बदली झालेल्या 58 पैकी 11 शिक्षकांनी अँजिओप्लास्टी झालेली असताना हृदय शस्त्रक्रियेचे कारण दिले. 20 शिक्षकांनी बदलीनंतर कागदपत्रे सादर केली, तर 27 शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्याऐवजी दु
.
पोलिसांना कागदपत्रे दिली – शिक्षणाधिकारी
पहिल्या टप्प्यात 37 जणांवर निलंबनाची कारवाई झाली. पोलिसांना चौकशीसाठी कागदपत्रे देण्यात आली आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिली.

बदलीत पती-पत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी दोघांपैकी एक जण 30 किमीपेक्षा जास्त अंतरावर कार्यरत हवा. यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे प्रमाणपत्र हवे असते; परंतु 27 शिक्षकांनी उपविभागीय अभियंत्यांचे प्रमाणपत्र दिले. ही बदली प्रक्रिया पं.स.व जि.प.च्या तपासणीनंतर झाली. त्यानंतरही घोटाळा झाला असून, त्रयस्थ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून गंभीर बाबी उजेडात आल्या. या चौकशी समितीचा गोपनीय अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला आहे. 3 सदस्यीय चौकशी समितीने बदली झालेल्या संवर्ग 1 व संवर्ग 2 अंतर्गत 930 शिक्षकांची कागदपत्रे तपासली. यात जि.प. व पं.स.चे काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कागदपत्रे मागितली आहेत.

ग्रामविकास विभागाच्या 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षकच सोयीच्या बदलीसाठी पात्र ठरतात. तर अँजिओप्लास्टी झालेले शिक्षक यासाठी पात्र ठरत नसल्याचा उल्लेख चौकशी समितीच्या अहवालात केला आहे.
1 शासन निर्णयाकडे दुर्लक्ष : पती माजी सैनिक असलेल्या शिक्षिकेने अर्ज केला. पती शासकीय सेवेत नाही, तरीही शिक्षिकेने सोयीची बदली घेतली. अकोला जि.प.त शिक्षक बदली घोटाळा; 11 जणांची हार्ट सर्जरी बोगस, 47 जणांची कागदपत्रे अवैध 2 प्रमाणपत्राला फाटा : पती-पत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीत अंतराबाबत कार्यकारीऐवजी उपविभागीय अभियंत्याचे प्रमाणपत्र जोडले.
3 शासन निर्णय: हदय शस्त्रक्रिया शिक्षकच बदली पात्र आहेत,अँजिओप्लास्टीला नाही. अँजिओप्लास्टी हृदय शस्त्रक्रिया मानले जात नाही, तरी लाभ घेतला.
4 मुदतीनंतर दिले प्रमाणपत्र : शिक्षकाने ‘आईला कर्करोग आहे’ असे प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्रावर 10 जून 2025 तारीख होती. हे प्रमाणपत्र मेपूर्वीचे हवे होते.