Headlines

इंदू मिल स्मारक 2027 पर्यंत पूर्ण करा- मुख्यमंत्री: 10 महिने काम बंद ठेवल्याने सरकार संतापले



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे रखडलेले काम वेगाने पूर्ण करून हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आर्थिक मागण्या पुढे करून काम रोखणे अयोग्य असून, कोणतीही दिरंगा

.

एमएमआरडीएचे दररोज लक्ष

स्मारकाच्या संथ गतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. काम पूर्ण करण्याचा सुधारित आराखडा कंत्राटदाराने उच्चाधिकार समितीकडे सादर करावा आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रगतीवर दररोज लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी दिले. स्ट्रक्चरल स्टील उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समन्वयाने समांतरपणे पूर्ण करावीत. प्रकल्पाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य यामध्ये कोणतीही तडजोड करू नये, अशी तंबीही त्यांनी दिली.

वाढीव खर्चाची होणार पडताळणी जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे वाढलेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

दहा महिने काम बंद ठेवणे अयोग्य- संजय शिरसाट

या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. “हे स्मारक जनभावनेशी जोडलेले असल्याने केवळ बांधकाम प्रकल्प म्हणून न पाहता सामाजिक महत्त्व ओळखून काम करावे. कोणतेही कारण देऊन दहा महिने काम बंद ठेवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *