कुंडली दोष दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प आणि नारायण नागबळी पूजा करतात. यात धारण केलेली सुतकाची सफेद वस्त्रे स्नानानंतर ‘त्याज्य’ म्हणून तेथेच सोडून देण्यास भाविकांना सांगण्यात येते. भाविकांची पाठ फिरताच ही वस्त्रे संकलित करून पुन्हा नाशिक
.
रोज त्र्यंबकला मागणी 12 हजार वस्त्रांची

भाविकांच्या भावनांशी खेळ
देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने, भावनेने येथे पूजेसाठी येतात. मात्र, असे प्रकार म्हणजे त्यांच्या भावनांशी खेळच आहे. हे थांबायला हवे. – शिवाजी गायकवाड, भाविक

विधीनंतर ‘त्याज्य’ सुतकी वस्त्रे भाविकांना पुन्हा विकली जातात कोरी म्हणून
या पूजांसाठी देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. त्यांना तेथेच खरेदी केलेली वस्त्रे घ्यायला लावतात. कुर्ता, पंचा, साडी असा साधारण 500 ते 700 रुपयांचा सेट भाविकांना नवा कोरा म्हणून विकला जातो.

विधीसाठी ‘त्याज्य सुतकी’ कपडे अशुभ
कुंडली व पितृदोष हा विधी शुद्धीसाठी आहे. त्यामुळे कोरी वस्त्रे आवश्यक. सुतकी वस्त्रे पुन्हा विकली जात असल्यास चुकीचे. कुणी असे करत असल्यास भाविकांमध्ये जनजागृती करत तक्रारींची दखल घेतली जाईल. – मनोज थेटे, अध्यक्ष, त्र्यंबक पुरोहित संघ