Headlines

2 हजारांसाठी बँक खाती भाडेतत्त्वावर: 400 विद्यार्थ्यांना 7 राज्यांच्या पोलिसांच्या नोटिसा, सायबर टोळ्यांकडून म्यूल खात्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर


पालकांनी शिक्षणासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी उघडून दिलेली साधी बँक खाती अवघ्या दोन हजार रुपयांच्या मोहापायी भाड्याने देणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगलट आले आहे. पुंडलिकनगर, छावणी, जवाहरनगर, मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडको, बेगमपुरा आणि वाळूज

.

महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थी किंवा जवळचे मित्रच ‘सब-एजंट’ म्हणून काम करत आहेत. “शेअर बाजारातील नफ्यावरील कर वाचवण्यासाठी खाते हवे आहे, एक लाखाच्या व्यवहारामागे दोन हजार रुपये देऊ,” असे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पासबुक, एटीएम कार्ड आणि नवीन सिमकार्ड घेत आहेत.

१.महागड्या मोबाइलचा मोह

बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका विद्यार्थ्याने स्मार्टफोन घेण्यासाठी सिनिअर मित्राच्या सांगण्यावरून स्वतःचे बँक खाते आणि सिमकार्ड दिले. त्याला सुरुवातीला चार हजार रुपये मिळाले. मात्र, आठवडाभरात त्याच्या खात्यातून १८ लाख रुपयांचे सायबर फसवणुकीचे व्यवहार झाले.

२. करबचतीच्या थापेला बळी

सिडको ठाण्याच्या हद्दीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला मित्राने शेअर बाजाराचा कर वाचवण्यासाठी खात्याची गरज असल्याचे सांगितले. त्याच्या खात्यात फसवणुकीचे पैसे आल्याने रडारवर आला आहे

३. पॉकेटमनीसाठी करिअर धोक्यात

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने दरमहा खर्चासाठी दोन हजार रुपये मिळतील या आशेने खाते भाड्याने दिले. एका सायबर गुन्ह्यात त्याचे खाते गोठवले गेले आहे.

इतरांसाठी रकमा स्वीकारू नये

अवघ्या दोन-चार हजार रुपयांच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते, एटीएम, चेकबुक किंवा सिमकार्ड कोणालाही देऊ नका. तसेच आपल्या बँक खात्यावर इतरांसाठी मोठ्या रकमा स्वीकारू नयेत. सायबर फसवणुकीचा पैसा तुमच्या खात्यात आल्यास तुम्ही थेट आरोपी ठरता. -गजानन कल्याणकर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक

पाल्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे

पालकांनी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे कोणत्याही आमिषाला बळी पडून ओटीपी किंवा ‘बँक किट’ शेअर न करणे, हाच यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. -प्रसाद मुळे, सायबर सुरक्षा तज्ज्ञ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *