![]()
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र बोरदहेगाव आणि देवी दाक्षायणी माता मंदिर, लासूरगाव येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी व कार्तिकी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे प्रस्थान झाले. मंगळवारी ब
.
यंदा पायी दिंडीचे २१ वे वर्ष आहे. या दिंडीत बोरदहेगाव, लासूरगाव तसेच परिसरातील महिला, पुरुष आणि तरुण वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पायी मार्गक्रमण करत ही दिंडी सलग १० दिवस प्रवास करून ११ व्या दिवशी कार्तिकी एकादशीला श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहोचणार आहे. वाटचालीत प्रत्येक मुक्कामाच्या गावात दिंडी कमिटीच्या वतीने वारकऱ्यांसाठी निवास, नाश्ता आणि भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे.
बोर दहेगाव येथील राष्ट्रसंत जनार्धन स्वामी महाराज दरवर्षी बोरदहेगाव ते आळंदी अशी पायी यात्रा करत असत. याच परंपरेचा धागा धरत श्रीक्षेत्र बोर दहेगाव येथील जनार्धन स्वामी महाराज आणि लासूरगाव येथील देवी दाक्षायणी माता हे श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या भेटीला दरवर्षी जातात, अशी श्रद्धा आणि भाव वारकरी भाविकांमध्ये आहे. दिंडीतील वारकरी आणि दिंडी प्रमुखांनीही हीच भावना व्यक्त केली. प्रस्थानाच्या दिवशी सकाळपासूनच टाळ-मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-माउली तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण बोरदहेगाव व लासूरगाव परिसर दुमदुमून गेला होता. आळंदीच्या दिशेने निघालेल्या या दिंडीमुळे परिसरात चैतन्य आणि आध्यात्मिक उत्साह पसरला आहे.