![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेली जाहिरात क्रमांक 017/2026 आणि त्यानंतरच्या शुद्धिपत्रकांच्या अनुषंगाने हा निर्णय
.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 27 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार प्राप्त झालेल्या अभिप्रायावरून आयोगाने समतुल्य शैक्षणिक अर्हतांबाबत नवे शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या नव्या तरतुदींमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी आयोगाने अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे.
सुधारित वेळापत्रक आणि अंतिम मुदत
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना आता 29 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंतची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
शुद्धिपत्रक आणि मुदतवाढीची पार्श्वभूमी
शासनाच्या विविध विभागांच्या मागणीपत्रांनुसार 25 जून रोजी मूळ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, 6 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त पदांच्या समावेशासाठी पहिले शुद्धिपत्रक काढून अर्ज करण्याची मुदत 27 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, 27 नोव्हेंबर रोजी समतुल्य शैक्षणिक अर्हतांबाबत सुधारित शुद्धिपत्रक निघाल्याने आयोगाने अर्ज प्रक्रियेला ही नवी मुदतवाढ दिली आहे.